महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ जुन ।। आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या चौदाव्या सामन्यात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. या सामन्यात राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानने न्यूझीलंडविरुद्ध एकतर्फी विजय मिळवला.
या वर्ल्ड कपमधला हा दुसरा मोठा अपसेट आहे. यापूर्वी अमेरिकेने पाकिस्तानचा पराभव केला होता, आता अफगाणिस्तानने किवी संघाला हरवून मोठा धक्का दिला आहे. असे कुणालाही वाटले नव्हते, मात्र या सामन्यात अफगाणिस्तानने 84 धावांनी विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे या सामन्यात अफगाणिस्तानने किवी संघाला अवघ्या 75 धावांत ऑलआउट केले.
Afghanistan put on a clinic with bat and ball against New Zealand to continue their winning momentum ????#T20WorldCup | #NZvAFG | ???? https://t.co/v8noS59c1q pic.twitter.com/du3txa6GL0
— ICC (@ICC) June 8, 2024
रहमानउल्ला गुरबाजने शानदार खेळी
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत अफगाणिस्तान संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरला आणि स्कोअर बोर्डवर 159 धावा लावल्या.
अफगाणिस्तानसाठी रहमानुल्ला गुरबाजने केवळ 56 चेंडूत 80 धावांची शानदार खेळी केली. यादरम्यान त्याने आपल्या बॅटने 5 चौकार आणि 5 षटकार मारले. याशिवाय इब्राहिम झद्राननेही 44 धावांची शानदार खेळी केली. अशाप्रकारे अफगाणिस्तानने किवी संघासमोर विजयासाठी 160 धावांचे लक्ष्य ठेवले होते.
क्षणभर असे वाटले की किवी संघ हे लक्ष्य गाठेल, कारण न्यूझीलंडच्या फलंदाजीत सखोलता आहे. पण 160 धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेला किवी संघ अवघ्या 75 धावांवर ऑलआऊट झाला आणि सामना 84 धावांनी गमवावा लागला.
किवी संघाची फलंदाजी फ्लॉप
न्यूझीलंडचा संघ फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा पहिल्याच चेंडूवर फिन ऍलनची विकेट पडली. यानंतरही किवी संघ एकामागून एक विकेट्स गमावत राहिला. केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडचा हा पराभव खूप मोठा आहे.
न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक 18 धावांची खेळी केली. याशिवाय मॅट हेन्रीने 12 धावा केल्या. हे दोन फलंदाज सोडले तर इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडाही गाठता आला नाही आणि एकापाठोपाठ एक विकेट गमावत राहिले. दोन किवी फलंदाज शून्यावर बाद झाले आहेत.