महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०९ जुन ।। पुणे : जिल्ह्यातील बारामतीमध्ये मॉन्सून दाखल झाला आहे. पुणे शहर आणि परिसरात शनिवारी पूर्व मोसमी पाऊस पडला. शहरासह जिल्ह्याच्या उर्वरित भागात मॉन्सून दाखल होण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. येत्या ४८ तासांत पुण्यापर्यंत नैऋत्य मोसमी वारे पोहोचतील, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे.
पुण्यात नैऋत्य मोसमी वारे पोहोचण्यास अनुकूल वातावरण झाल्याने आणि उंच ढगांची निर्मिती झाल्याने शनिवारी सायंकाळी कमी वेळात जास्त पाऊस झाल्याचेही हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले.
जिल्ह्यात रविवारी ‘येलो अलर्ट’
जिल्ह्यात तुरळक ठिकणी रविवारी (ता. ९) विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा आहे, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.