महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०९ जुन ।। NDA Oath Ceremony : नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून रविवारी तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. यावेळी भाजपला अपेक्षित यश मिळालं नसलं तरी एनडीएमधल्या घटकपक्षांमुळे भाजप पुन्हा सत्तेवर बसणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या तिसऱ्या सरकारमध्ये त्यांना एनडीएमधील घटकपक्षांना चांगल्या जागा देऊन संधी द्यावी लागणार आहे. त्यामुळे कुणाला किती जागा मिळणार? याबद्दल रविवारी संध्याकाळी स्पष्टता येईल.
दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आणि राजनाथ सिंह यांना मंत्रिपदाची पुन्हा संधी मिळणार नाही, अशी चर्चा होती. मोदी-शाह यांच्याशी त्यांचं नसलेलं सख्य सर्वश्रुत आहे. त्यामुळे हे दोन नेते मंत्रिपदापासून दूर राहतील असं सांगितलं जात होतं.
परंतु राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांना मंत्रिपदासाठी फोन गेल्याची माहिती आहे. त्यामुळे या दोन नेत्यांना भाजपकडून कोणती खाती मिळतात, हे पाहाणं महत्त्वाचं आहे. ‘टीव्ही ९ मराठी’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महाराष्ट्रात कुणाला किती जागा?
NDA- 17
BJP – 09
Shivsena (Eknath Shinde) – 07
NCP (Ajit Pawar) – 01
INDIA- 30
Congress- 13
Shivsena (Uddhav Thackeray) – 09
NCP (Sharad Pawar)- 08
Independent- 01 (congress)