महागाईचा सामना; निर्बंध हटताच धान्य, डाळींसह तेल महागणार; केंद्र सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० जुन ।। देशात भाजप प्रणीत एनडीए सरकारने सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केली असली तरी हे कुबड्यावरील सरकार आहे. त्यामुळे सरकार चालविताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तारेवरची कसर करावी लागणार आहे. तर जनतेला महागाईचा सामना करावा लागणार आहे.

केंद्र सरकारच्या दबावामुळे गेल्या दोन महिन्यापासून सर्वच धान्यासह डाळींचे भाव स्थिरावलेले आहेत. पुढील काही दिवसात हे निर्बंध हटणार असल्याने सर्वच धान्यांसह डाळ आणि तेलाच्या दरात वाढ होणार असल्याचे संकेत व्यापाऱ्यांकडून मिळाले आहेत. परिणामी, सर्वसामान्यांचे जगणे कठीण होणार आहे.

निवडणूक जाहीर होण्यापूर्वी तुरीच्या डाळींची सरासरी किंमत १७० रुपये होती ती आता १९० रुपयांवर गेली आहे. पुढील महिन्याभरात तूर डाळ २०० रुपयांचा टप्पा पार करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याशिवाय गव्हाच्या दरातही वाढ होऊ लागली आहे. ३२ रुपये किलो असलेला गहू आता ३४ रुपयांवर गेला आहे. खाद्य तेलाच्या दरातही वाढ अपेक्षित आहे. या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचा दैनंदिन खर्चाचा ताळमेळ बिघडण्याची शक्यता आहे.

याशिवाय तांदळाच्या दरातही वाढ झालेली आहे. प्रतिकिलो तांदूळ दोन रुपयांनी महागले आहे. एक किलो तांदळासाठी पूर्वी ६० रुपये मोजावे लागत होते. त्यासाठी आता ६२ रुपये मोजावे लागणार आहे. तसेच ५० रुपये किलो असलेल्या तांदळासाठी ५२ रुपयावर गेले आहे. निवडणुकीच्या निकाल लागले असून आता सरकारही स्थापन झालेले आहे.

सध्या केंद्र सरकारने महागाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी व्यापाऱ्यांना दर आठवड्याच्या साठ्याची माहिती देण्याची सक्ती केलेली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून धान्यासह डाळी, तांदूळ आणि तेलाच्या खरेदीवर निर्बंध आले आहेत. हा दबाव दूर होताच. व्यापाऱ्यांकडून खरेदीचा सपाटा वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर सर्वच जिन्नसांचे भाव आकाशाला भिडणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *