‘मोदी सरकारमध्ये आमच्यासोबत दुजाभाव झाला’; बारणे यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० जुन ।। देशातील नव्या एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा काल पार पडला. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली. सरकार स्थापन होऊन काही तास उलटले असतानाच एनडीएच्या घटक पक्षांमधील नाराजी चव्हाट्यावर आली आहे. राज्यात शिवसेना शिंदे गटाला एकच मंत्रीपद दिल्याने खासदार श्रीरंग बारणे यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करत भाजपवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले श्रीरंग बारणे?
“काल नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. हे एनडीए सरकार स्थापन होऊन चोवीस तास ही उलटले नाहीत, तोवर एनडीए गटातील खदखद चव्हाट्यावर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला केंद्रीय राज्यमंत्री पद देऊन, दुजाभाव करण्यात आला,” असे म्हणत मावळचे नवे खासदार श्रीरंग बारणे यांनी जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली आहे.

“आमच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट पाहता, आम्हाला कॅबिनेट मंत्री पद द्यायला हवं होते. एनडीएमधील इतर घटक पक्षांचे एक-एक खासदार निवडून आलेत, मात्र त्यांना कॅबिनेट मंत्री पद दिले गेले. मग शिंदे गटाबाबत भाजपने हा दुजाभाव का केला? असा सवाल श्रीरंग बारणे यांनी उपस्थित केला आहे.

तसेच “कुटुंबाविरोधात जाऊन महायुतीत आलेल्या अजित पवारांना ही एक मंत्री पद द्यायला हवं होतं. भाजपने साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसलेंना ही मंत्री पद द्यायला हवं होते, असं म्हणत बारणेंनी सगळी खदखद बोलून दाखवली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *