Gold Rate ; उच्चांकी दरवाढीनंतर सोन्याचे दर कोसळले, 24 ग्रॅमचा भाव वाचा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ जुन ।। Gold Rate Today 11th June: सोन्या-चांदीच्या दरात सोमवारी मोठी घसरण झाली होती. मंगळवारीही सोन्याचा दरात 300 रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे. आंतराराष्ट्रीय बाजारात दर घसरल्याने त्याचा परिणाम भारतीय वायदे बाजारातही दिसून येत आहे. MCXवर आज सकाळी 300 रुपयांनी सोन्याचे दर घसरले असून 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमसाठी 71,840 रुपये इतके आहे. तर, चांदीच्या दरातही घट झाल्याचे नोंदवण्यात आले आहे. MCXवर चांदीच्या दरात 1430 रुपयांची घट झाल्याचे नोंदवण्यात आले आहे. सध्या चांदीचा दर 88,592 इतका आहे.

सोन्या-चांदीच्या दरात घसरण का?
आंतराराष्ट्रीय बाजारात निर्माण झालेल्या परिस्थीतीमुळं सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. मंगळवारी युएस फेडरल रिझर्व्ह बँकेची बैठक सुरू होणार आहे. जॉब डेटा पाहता सप्टेंबरनध्ये दर कमी होण्याची चिन्हेही धुसर होत आहेत. त्याच वेळी, अमेरिकेच्या किरकोळ महागाईचे आकडे देखील येणार आहेत, त्याआधी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात कमजोरी दिसून आली आहे. त्यातच चीनने सोन्याची खरेदी बंद केली असून, मे महिन्याच्या विक्रमी उच्चांकावरून भाव खाली येईपर्यंत चीन खरेदी सुरू करणार नाहीये.

स्पॉट गोल्ड 0.3% घसरून $2,302 प्रति औंस झाले आहे. तर यूएस गोल्ड फ्युचर 0.3% खाली 2,320 वर आहे. चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. स्पॉट चांदी देखील 1.99% घसरून $29.22 प्रति औंस झाली.

ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 65, 850 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 71,840 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 53,880रुपये

ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 6,585 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 7,184 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 5,388 रुपये

ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 52, 680 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 57,472 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 43,104 रुपये

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
22 कॅरेट- 65, 850 रुपये
24 कॅरेट- 71,840 रुपये
18 कॅरेट-53,880 रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *