शाळांच्या सुट्यांची यादी जाहीर ! शाळांना या वर्षी 124 दिवस सुट्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ जुन ।। सोलापूर ; यंदाच्या शैक्षणिक वर्षातील सार्वजनिक सुट्यांची यादी प्राथमिक शिक्षण विभागाने जाहीर केली आहे. २०२४-२५ मध्ये सार्वजनिक सुट्या ७६ दिवसांच्या तर वर्षातील रविवार, असे मिळून यंदा १२४ दिवस शाळा बंद राहणार आहेत. दिवाळीच्या सुट्ट्या १२ दिवसांची असणार आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळांची वेळ सकाळी साडेदहा ते पाच वाजेपर्यंत भरतील. अर्ध्या दिवसाच्या शाळेची वेळ सकाळी नऊ ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत असणार आहे. रमझान उपवासानिमित्त उर्दू माध्यमाच्या प्राथमिक शाळा सकाळी नऊ ते दुपारी अडीच वाजेपर्यंत भरतील, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी स्पष्ट केले आहे. शाळेच्या कामकाज दिवशी ६० मिनिटांची मोठी सुटी तर पहिल्या व दुसऱ्या सत्रात दहा मिनिटांच्या दोन लहान सुट्या असतील. प्राथमिक शाळा सतत तीन दिवस बंद राहणार नाहीत, याची दक्षता मुख्याध्यापकांनी (गावची यात्रा असा अपवाद वगळता) घ्यायची आहे. यादीतील सुट्या सोडून इतर दिवशी थोर महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी असल्यास त्या दिवशी शाळा भरवून विविध स्पर्धांचे आयोजन करावे. २६ नोव्हेंबर रोजी शाळेत संविधान दिन साजरा करावा, असेही शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

‘या’ दिवशी असणार सार्वजनिक सुटी
१७ जून (बकरी ईद), २१ जून (वटपौर्णिमा), १७ जुलै (मोहरम, आषाढी एकादशी), १५ ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन- पारशी नववर्ष), १९ ऑगस्ट (रक्षाबंधन), २ सप्टेंबर (पोळा), ७ सप्टेंबर (गणेश चतुर्थी), ११ सप्टेंबर (गौरीपूजन), १६ सप्टेंबर (ईद ए मिलाद), १७ सप्टेंबर (अनंत चतुर्दशी), २ ऑक्टोबर (महात्मा गांधी जयंती), ३ ऑक्टोबर (घटस्थापना), १२ ऑक्टोबर (दसरा), २८ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर (दीपावली सुटी), १५ नोव्हेंबर (गुरूनानक जयंती), २५ डिसेंबर (ख्रिसमस, नाताळ), १४ जानेवारी (मकर संक्रांती), २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन), १९ फेब्रुवारी (छत्रपती शिवाजी महाराज जयंती), २६ फेब्रुवारी (महाशिवरात्री), १४ मार्च (धूलिवंदन), १९ मार्च (रंगपंचमी), ३० मार्च (गुढीपाडवा, रमझान ईद), ६ एप्रिल (रामनवमी), १० एप्रिल (महावीर जयंती), १४ एप्रिल (डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती), १८ एप्रिल (गुडफ्रायडे), १ मे (महाराष्ट्र दिन), २ मे ते १४ जून (उन्हाळा सुटी).

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *