T20 World Cup 2024: इंग्लंडने अवघ्या 19 चेंडूत जिंकला सामना, सुपर-8 च्या आशाचीही उंचावल्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ जुन ।। T20 World Cup 2024, England vs Oman: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत 28 व्या सामन्यात इंग्लंडने ओमानविरुद्ध 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. इंग्लंडसाठी हा निर्णायक सामना होता, त्यामुळे त्यांना या सामन्यात विजय गरजेचाच होता. त्यामुळे आता गतविजेत्या इंग्लंडने विजय मिळवत आपले आव्हान कायम ठेवले आहे.

अँटिग्वाला झालेल्या या सामन्यात ओमानने इंग्लंडसमोर अवघ्या 48 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग इंग्लंडने 2 विकेट्स गमावत अवघ्या 19 चेंडूत म्हणजेच 3.1 षटकातच पूर्ण केला.

या मोठ्या विजयामुळे इंग्लंडचा नेट रन रेटही चांगला झाला आहे. त्यांचा नेट रन रेट सध्या ग्रुप बी मध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या स्कॉटलंडपेक्षा चांगला असल्याने आता इंग्लंडच्या सुपर-8 फेरीत पोहण्याच्या आशा उंचावल्या आहेत.

या सामन्यात 48 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडकडून कर्णधार जोस बटलरने सर्वाधिक 24 धावांची नाबाद खेळी केली. तसेच फिल सॉल्टने 12 धावांची खेळी केली, तर विल जॅक्सने 5 धावा आणि जॉनी बेअरस्टोने नाबाद 8 धावांची खेळी केली. ओमानकडून बिलाल खान आणि कालीमुल्लाह यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

https://x.com/ICC/status/1801360018266042676

तत्पुर्वी, इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय इंग्लंडच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला.

सुरुवातीला मार्क वूड आणि जोफ्रा आर्चर या वेगवान गोलंजांनी ओमानला मोठे धक्के दिल्यानंतर आदिल राशिदच्या फिरकीने त्यांच्या मधल्या आणि खालच्या फळीला खिळखिळं केलं. ओमानकडून केवळ शोएब खानला दुहेरी आकडा पार करता आला. त्याने 11 धावा केल्या.

इंग्लंडकडून आदिल राशिदने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच जोफ्रा आर्चर आणि मार्क वूड यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

आता इंग्लंडचा पहिल्या फेरीतील अखेरचा सामना शनिवारी (15 जून) नामिबियाविरुद्ध होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *