महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ जुन ।। राज्याच्या काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली तर काही भागात अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज राज्यात बहुतेक भागात पावसाच्या रिमझिम सरी पाहायला मिळतील. आयएमडीच्या अंदाजानुसार, ठाणे, मुंबई, पालघर, रायगड या भागात मध्यम ते हलक्या पावसाच्या शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात या भागात पावसाची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस तर काही मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तर विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर, ठाणे, पुणे, अहमदनगर, धाराशिव, सोलापूर आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावेल.
पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज.
शहर आणि उपनगरात सामान्यतः ढगाळ आकाश राहील आणि हल्का ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३°C आणि २७°C च्या आसपास असेल.— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) June 13, 2024
मॉन्सूनने संपूर्ण कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राचा बहुतांश भाग आणि विदर्भाच्या काही भागांत प्रगती केली आहे. काल अमरावती आणि चंद्रपूरपर्यंतच्या भागापर्यंत धाव घेतली आहे. आज मॉन्सूनच्या वाटचालीची सीमा कायम होती. अरबी समुद्रावरून वेगाने वाटचाल करणाऱ्या मॉन्सूनचा बंगालच्या उपसागरावरील वेग मंदावलेला आहे. त्यामुळे पूर्व विदर्भात अद्यापही मॉन्सूनची प्रतीक्षा आहे.
विदर्भात शुक्रवारी (ता. १४) तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. कोकणात जोरदार सरींची शक्यता आहे. उर्वरित राज्यात काहीशी उघडीप देण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
जोरदार सरींची शक्यता :
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ