महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ जुन ।। पंढरपूर : पंढरपूरची वारी जाणारा नव्याने तयार करण्यात आलेला पंढरपूर ते आळंदी मार्ग अवघ्या दीड वर्षात खचला आहे. यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वारकऱ्यांसाठी १० हजार कोटी रुपये खर्च करून केलेला मार्गाच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पंढरीची वारी (Pandharpur Wari) सुखकर व्हावी; यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आळंदी ते पंढरपूर असा हजारो कोटी रुपये खर्च करून मार्ग नव्याने तयार करण्यात आला होता. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग तयार केला आहे. पण माळशिरस तालुक्यातील तोंडले बोंडले ते वेळापूर दरम्यान २०० मीटर रस्ता ६० फूट खोल खचला आहे. सदर काम गुणवत्ता पूर्ण न झाल्याने हजारो कोटी रुपये खर्च करून केलेला (Alandi) पालखी मार्ग खचल्याचे दिसत आहे. त्यामुळे या मार्गाच्या दर्जा बाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
पंधरा दिवसात येणार वारी
पायी वारी जाणारा हा मार्ग वारकऱ्यांच्या दृष्टीने निश्चितच सुखकर ठरणारा आहे. दीड वर्षांपूर्वी काम झाल्याने मागील वर्षी या मार्गावरून वारी गेली होती. आता महिनाभरावर आषाढी एकादशी आहे. त्यापूर्वीच रस्ता खचल्याने या मार्गावरून पुढील काही दिवसात पायी वारी येणार आहे. त्या पूर्वी हा खचलेला रास्ता तयार करावा लागणार आहे.