महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ जुन ।। कॅन्सर म्हणजे महाभयंकर रोग. किमो थेरेपीसह विज्ञान तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं असलं तरी कॅन्सर झाल्यावर त्या व्यक्तीचा मृत्यू अटळ असतो. खर्चिक आणि महागडी औषधे केल्यावर कॅन्सर पीडित व्यक्ती काही काळ जास्त जगते.मात्र गरीब घरात औषधासाठी जास्त पैसे नसतात. त्यामुळे या आजाराने देशातील अनेक व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेकांनी आपली जवळची माणसे गमावली आहेत. अशात कॅन्सर होण्याआधी कोणती लक्षणे जाणवतात ते पाहू.
डोके दुखी
ब्लड कॅन्सर असलेल्या व्यक्तीला सुरुवातीला जास्त डोकेदुखीचा सामना करावा लागतो. दिवसभर काहीही काम न करता देखील अनेकांना जास्त डोके दुखी होते. सुरुवातीला डोके दुखी नंतर नाकातून रक्त येण्यास सुरुवात होते.
जास्त थकवा
ज्या व्यक्तींना कॅन्सर आहे त्यांना जास्त प्रमाणात थकवा जाणवतो. काही केल्या थकवा कमी होत नाही. सतत जीव कासावीस होतो.
शरीरात गाठी होतात
कॅन्सर होण्याआधी त्या व्यक्तीच्या शरीरात एक गाठ येते. त्यानंतर या गाठी वाढत जातात. याचे निदान लवकर होत नाही.
वजन कमी जास्त होणे
ज्या व्यक्तींना कॅन्सर असतो त्यांचे वजन अचानक कमी किंवा जास्त होते. वजन कमी जास्त होण्यामागे कॅन्सर हे कारण असू शकते. कॅन्सर झालेल्या व्यक्तींते वजन शक्यतो झपाट्याने कमी होते.
श्वसनाच्या समस्या
ज्या व्यक्तींना कॅन्सरची लागण होते त्यांना सुरुवातीच्या काळात अचानक जास्त चालल्यावर थकवा जाणवतो. काही दिवसांनी हा त्रास आणखी जास्त वाढू लगतो. त्यामुळे आपल्याला दमा झाला आहे की, काय? असा प्रश्न त्या व्यक्तीच्या मनात येतो. मात्र दम्याची टेस्ट निगेटीव्ह आली तर लगेचच कॅन्सरची टेस्ट केली पाहिजे.
सतत ताप येणे
कॅन्सर झालेल्या व्यक्तीला काहीवेळा अन्य कोणताही त्रास होत नाही, फक्त सतत ताप येतो. ताप दिवसेंदिवस जास्त वाढतो. ताप जास्त वाढल्यामुळे कधी कधी ताप थेट डोक्यात देखील जातो आणि त्या व्यक्तीचा मृत्यू होतो.
टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. स्वत:चा बचाव कसा होईल यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.