महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ जुन ।। राज्यात सोने तसेच चांदीच्या दरात सातत्याने चढउतार सुरू आहे. त्यामुळे अन्य शहरांमधील सोने-चांदीचे दरही कमी जास्त होताना दिसत आहेत. सकाळी ९ वाजता आलेल्या दरांनुसार आज सोने आणि चांदी दोन्हीही स्वस्त झाले आहे. भाव उतरल्याबरोबर दागिने खरेदीसाठी ग्राहकांनी दुकानांबाहेर गर्दी केलीये.
२२ कॅरेटच्या किंमती
आज २२ कॅरेट सोने-चांदीच्या किंमती १०० रुपयांनी घसरल्या आहेत. त्यामुळे १०० ग्राम सोन्याची किंमत ६,६६,४०० रुपये आहे. तर ६६,६४० रुपये प्रति तोळा सोन्याचे दर आहेत. यासह ८ ग्राम सोन्याची किंमत ५३,३१२ रुपये आहे. तसेच ६,६६४ रुपये प्रति ग्राम सोन्याची किंमत आहे.
२४ कॅरेटच्या किंमती
२४ कॅरेट सोन्याचे दरही कमी झाले आहेत. आज १०० ग्राम सोन्याची किंमत १०० रुपयांनी घसरली आहे. त्यामुळे ७,२६,९०० रुपये इतकी १०० ग्राम सोन्याची किंमत आहे. त्यानंतर १० ग्राम सोन्याचा भाव ७२,६९० रुपये इतका आहे. ५८,१५२ रुपये ८ ग्राम सोन्याचा भाव आहे आणि ७,२६९ रुपये १ ग्राम सोन्याचा भाव आहे.
मुंबई पुण्यातील भाव
मुंबईमध्ये ६,६४९ रुपये २२ कॅरेट प्रति ग्राम सोन्याची किंमत आहे. तर २४ कॅरेट प्रति ग्राम सोन्याचा भाव ७,२५४ रुपये इकता आहे.
पुण्यामध्ये ६,६४९ रुपये २२ कॅरेट प्रति ग्राम सोन्याची किंमत आहे. तर २४ कॅरेट प्रति ग्राम सोन्याचा भाव ७,२५४ रुपये इकता आहे.
चांदीच्या किंमती
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी चांदीच्या किंमती देखील घसरल्या आहेत. त्यामुळे आज चांदी १०० रुपयांनी घसरलीये. त्यामुळे १ किलो चांदीचा भाव ९०,९०० रुपये इतका झाला आहे.
मुंबई, पुणे या शहरांमध्ये देखील चांदी प्रति किलो ९०,९०० रुपयांवर पोहचली आहे. यासह अहमदाबाद, पटना, नवी दिल्ली, सूरत या शहरांमध्ये देखील चांदीचा भाव ९०,९०० रुपये प्रति किलो आहे.