तामिळनाडूमध्ये विषारी दारू प्यायल्याने २५ जणांचा मृत्यू, ६० रुग्णालयात दाखल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० जुन ।। तामिळनाडूच्या कल्लाकुरिची जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने २५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६०हून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कल्लाकुरिची जिल्हा कलेक्टर एमएस प्रशांत यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. कल्लाकुरिचीच्या जिल्हा कलेक्टर एमएस प्रशांत यांनी जिल्ह्याच्या सरकारी मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचार घेत असलेल्या लोकांची भेट घेतली.

या प्रकरणी ४९ वर्षीय अवैध दारू विक्रेत्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून तब्बल २०० लीटर अवैध दारू जप्त करण्यात आली. यावेळी तपास केला असता त्यात घातक मेथनॉल होते.

मुख्यमंत्री एमके स्टालिन या मृत्यूप्रकरणी दु:ख व्यक्त केले. तसेच हे रोखण्यात अयशस्वी ठरलेल्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आल्याचे सांगितले.

स्टालिन यांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले की कल्लाकुरिचीमध्ये भेसळयुक्त दारू पिणाऱ्या लोकांच्या मृत्यूचाी बातमी ऐकून मी स्तब्ध आणि दु:खी झालो. याप्रकऱणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे रोखण्यात अयशस्वी ठरलेल्या अधिकाऱ्यांच्याविरोधातही कारवाई कऱण्यात आली आहे. जर लोकांनी अशा गुन्ह्यांमध्ये सामील लोकांबाबत माहिती दिली तर तत्काळ त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *