Mumbai-Pune Expressway: लोणावळ्याला जाताय? मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठा जाम, वाहनांच्या रांगा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ जुन ।। विकेंड असल्याने पर्यटनासाठी लोणावळ्याकडे येणाऱ्या मुंबई पुणे महामार्गावर खंडाळा घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सुमारे पाच ते सहा किलोमीटरपर्यंत या रांगा लागल्या आहेत. मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर ही वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. पोलिस प्रशासनाकडून वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

शनिवार आणि रविवार सलग सुट्ट्या आल्याने अनेक पर्यटक पर्यटनासाठी लोणावळ्यामध्ये दाखल होत आहेत. सकाळच्या सुमारास अनेक वाहने लोणावळ्याकडे निघाले असताना ही वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. पावसाळा सुरू झाल्याने मावळ तालुक्यातील पर्यटन खुलू लागले आहे. त्यामुळे पुणे, मुंबईसह राज्यभरातून पर्यटक मावळ तालुक्यातील लोणावळ्यामध्ये पर्यटनासाठी दाखल होताना पाहायला मिळत आहे.

अचानक वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडी
रस्त्यावर वाहनांची संख्या वाढली, तसेच अवजड वाहने देखील वाढल्याने ही वाहतूक कोंडी झाल्याचे प्रथमदर्शनी पाहायला मिळत आहे. ही वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांना तासंतास वाट पहावी लागत आहे. मुंबईहून पुण्याकडे अनेक नागरिक ये-जा करत असतात. त्यात शनिवार -रविवार सुट्टी आल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिक घराच्या बाहेर पडले आहेत.

महामार्ग पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या वाहतूक कोंडीमुळे सकाळपासूनच महामार्ग जाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. लोणावळ्यामध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये मुंबईच्या नागरिकांचा समावेश अधिक आहे. महामार्ग पोलीस ठिकठिकाणी उभे राहून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. या वाहतूक कोंडीमुळे लांब पल्ल्याच्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तरी ही वाहतूक कोंडी लवकरात लवकर सुरळीत करावी, अशी मागणी प्रवासी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *