संपूर्ण वीज बिल एकत्रित भरल्यास दोन टक्क्यांची सूट ; ऊर्जामंत्री नितीन राऊत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी ऊर्जामंत्रीनितीन राऊतयांनी पुढाकार घेतला आहे. आता संपूर्ण वीज बिल एकत्रित भरल्यास दोन टक्क्यांची सूट दिली जाईल, अशी घोषणाच नितीन राऊत यांनी मंगळवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.मागील आठवड्यात तीन महिन्यांच्या एकत्रित वीज बिलांमुळे ग्राहकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. तो लवकरात लवकर दूर करण्याच्या दृष्टीकोनातून नितीन राऊत हे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सवांद साधत आहेत.

लॉकडाउनच्या काळातील वीज बिल भरणा प्रमाण अत्यंत कमी असल्याने महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. अशा बिकट परिस्थितीत, वीज ग्राहकांना सवलत देण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे निधीची मागणी करणार करत आहेत. लॉकडाउनमुळे ग्राहकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना अतिरिक्त भुर्दंड पडू नये. तसेच त्यांना वीज बिल भरण्यासाठी जास्तीत जास्त सवलत कशा पद्धतीने देता येइल यादृष्टीने निर्णय घेतले जात आहेत.

बिलाबाबत ग्राहकांचे समाधान होण्यासाठी ग्राहकांशी प्रत्यक्ष अधिकाधिक संवाद वाढविला जात आहे. वीज बिल सोप्या भाषेत समजावून सांगितले जात आहे. यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा प्रभावी वापर केला जात आहे. जून महिन्यामध्ये मागील दोन महिन्यांसह मीटर रीडिंगनुसार वीज बिल दिल्यानंतर त्याबाबतीत ग्राहकांमध्ये असलेल्या शंकांचे निरसन, तक्रारींचे निवारण करण्यासाठी महावितरणच्या राज्यभरातील सर्व कार्यालयांमध्ये ग्राहक तक्रार निवारण कक्ष सुरू करण्यात आले आहे. मेळाव्यांसह वेबिनारचे आयोजन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *