Whatsapp Dialer : व्हॉटसअ‍ॅपचं कॉल साठी आता नंबर सेव्ह करण्याची गरज नाही, थेट करा कॉल; नवं अपडेट आलंय; फिचर्स जाणून घ्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ जुन ।। Whatsapp Feature : व्हॉट्सअ‍ॅप नेहमीच आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असते. हल्ली त्यांनी अनेक फीचर्स लॉंच केले आहेत. ज्यामध्ये बॅकग्राऊंड चेंज,वॉइस स्टेटस वेळेत वाढ, AR फीचर असे अनेक अपडेटेड फीचर आणले. अजून एक आनंदाची बातमी देत व्हॉट्सअ‍ॅपने पुढील अपडेटमध्ये अजून एक नवीन फीचर लॉंच करण्याची घोषणा केली आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवर लवकरच एक नवीन इन-अॅप डायलर येणार आहे. याचा अर्थ आता तुम्हाला एखाद्याला कॉल करायचा असेल आणि तो नंबर तुमच्या फोनबुकमध्ये नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. थेट व्हॉट्सअ‍ॅपवरच तुम्ही नंबर डायल करून कॉल करू शकणार आहात.

हे नवीन फीचर अँड्रॉइड बीटा युजर्ससाठी आधीच टेस्टिंगमध्ये आहे. याचा अर्थ लवकरच हे फीचर सर्व व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी उपलब्ध होईल. यामुळे आता एखाद्याला कॉल करण्यासाठी त्यांचा नंबर फोनमध्ये सेव्ह करण्याची झंझट वाचणार आहे.

या इन-अॅप डायलरमध्ये तुम्हाला नंबर टाईप करण्यासाठी जागा मिळेल. तसेच नंबर डायल करण्यासाठी आणि कॉल एंड करण्यासाठी बटन्स देखील असतील. इतकेच नाही तर, त्या विशिष्ट नंबरवर व्हॉट्सअ‍ॅप असल्यास एक मेसेजिंगचा पर्याय देखील असेल. म्हणजेच कॉल करायचा की मेसेज करायचा हा निर्णय तुम्ही सहज घेऊ शकणार.

या फीचरमुळे कॉलिंगचा अनुभव अधिक सुखद होणार आहे. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर कॉल करणे आणखी सोपे होईल. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपच्या या नवीन फीचरची आतुरतेने वाट पाहाण्यासारखी गोष्ट आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *