पुण्यातील पबच्या तोडफोड प्रकरणी Ravindra Dhangekar यांची प्रतिक्रिया

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ जुन ।। पुण्यातील एफ सी रोडवर असलेले एल ३ हॉटेलची तोडफोड करण्यात आली आहे. पतित पावन संघटनेकडून या बारची तोडफोड करण्यात आली आहे. पुण्यातील याच बारमध्ये काल काही तरुण ड्रग्सचे सेवन करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी ८ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातील या सर्व प्रकरणावर काँग्रेसेच नेते रवींद्र धंगेकर यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. मी कालच बोललो होतो की, जनतेला हा कायदा हातात घ्यावा लागेल. पोलिसांचे हात बांधले असून पोलीस हफ्तेखोरीमध्ये अडकलेले आहेत. त्याच्यामुळे पुण्यात पब संस्कृती फोफवली आहे, अशी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *