तीन रुपयांच्या पेनी स्टॉकची हवा, तुम्हाला मालामाल करणार का?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ जुन ।। Minaxi Textiles ltd share price: शेअर बाजारात अशा अनेक कंपन्या आहेत ज्या शांतीत क्रांती करतात. म्हणजेच या कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देतात. यामध्ये पेनी स्टॉक म्हणून ओळख असलेल्या काही कंपन्यांचाही समावेश आहे. यामध्ये टेक्स्टाईल क्षेत्रातील मिनाक्षी टेक्स्टाईल या कंपनीचा समावेश आहे. या कंपनीला सोमवारी शेअर बाजारावर थेट अपर सर्किट लागले होते. या शेअरचे मूल्य सोमवारी 3.12 रुपयांपर्यंत वाढले. एका दिवसात हा शेअर थेट 20 टक्क्यांनी वाढला. 20 जानेवारी 2024 रोजी हा शेअर थेट 4.35 रुपयांपर्यंत पोहोचला होता. जुलै 2023 मध्ये हा स्टॉक 1.21 रुपयांच्या नीचांकी पातळीवर गेला होता. मिनाक्षी टेक्स्टाईलचे हे 52 आठवड्यांतील नीचांकी मूल्य आहे.

कंपनीच्या मालकीसंदर्भात नेमकी माहिती काय?
मिनाक्षी टेक्स्टाईल या कंपनीच्या शेअरहोल्डिंगबाबत बोलायचे झाल्यास मार्च 2024 पर्यंत या कंपनीतील 38.34 हिस्सा कंपनीच्या प्रमोटर्सकडे होता. 61.66 टक्के मालकी ही पब्लिक शेअरहोल्डर्सकडे आहे. प्रमोटर्स दिनेश, कृती कुमार पटेल यांच्याकडे 18 टक्क्यांपेक्षा जास्त हिस्सेदारी आहे.

कंपनीची इतर माहिती काय?
मिनाक्षी टेक्स्टाईल ही कंपनी 1995 साली स्थापन झाली. या कंपनीकडून सुटिंग, शर्टिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या सिंथेटिक ग्रे कापडाची निर्मिती केली जाते. या कंपनीकडून शासनाच्या अनेक विभागांना कापड पुरवले जाते. मिनाक्षी टेक्स्टाईलने आदित्य बिरला उद्योग समुहासोबत 30 वर्षांसाठी एक करार केलेला आहे. ही कंपनी आदित्य बिर्ला ग्ररुपा लिनन कापड देते. या कंपनीचे संस्थापक कनुभाई पटेल यांनी नुकतेच निवृत्ती घेतली. निवृत्तीच्या अगोदर वर्ष 2006-07 या काळात ते एमडी या पदावर कार्यरत होते.

सध्या शेअर बाजाराची स्थिती काय आहे?
सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (Sensex) 131.18 म्हणजेच 0.17 टक्क्यांची तेजी मिळाली. मुंबई शेअर बाजार सोमवारी दिवसाअखेर 77,341.08 अंकांनी बंद झाला. सोमवारी बाजार चालू असताना हा निर्देशांक सुरुवातीला 463.96 अंकांनी घसरला होता. नंतर मात्र 213.12 अंकांसह या निर्देशांकांत तेजी आली. राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) अर्थात एनएसईचा निर्देशांक निफ्टीही 36.75 अंकांनी म्हणजेच 0.16 टक्क्यांच्या वाढीसह 23,537.85 अंकांवर स्थिरावला. दरम्यान, ही कंपनी पेनी स्टॉक्समध्ये मोडत असली तरी दीर्घ काळाच्या मुदतीच्या माध्यमातून ही कंपनी चांगले पैसे देऊ शकते, असे मत व्यक्त केले जातेय

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *