Auto Tech Expo 2025 : सगळ्या ई-कार आता एकाच छताखाली, मनाप्रमाणे करा पसंत; ऑटो एक्सपो मध्ये ; जाणून घ्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ जुन ।। भारतातील सर्वात मोठा ऑटो एक्सपो 2025 (Auto Tech Expo 2025) पुढीलवर्षी भरवला जाणार आहे. यावेळी अनेक कार कंपन्या त्यांच्या अत्याधुनिक गाड्यांचं प्रदर्शन करणार आहेत. यामध्ये काही नवीन तर काही अन्य गाड्यांचा समावेश असणार आहे. चला तर जाणून घेऊया या प्रदर्शनात कोणत्या गाड्या पाहायला मिळणार आहेत..

ह्युंदाई भारताच्या बाजारपेठेत इलेक्ट्रिक कार घेऊन येण्याची तयारी करत आहे. त्यांची पहिली मास-मार्केट इलेक्ट्रिक कार म्हणजे Creta EV. सध्या ही कार चाचणीच्या टप्प्यात आहे. 2024 च्या अखेरपर्यंत या कारचे अनावरण होण्याची शक्यता आहे आणि 2025 च्या ऑटो एक्सपोमध्ये ही कार लॉन्च होऊ शकते. अंदाजानुसार ही कार 45 kWh च्या बॅटरी पॅकवर चालणार असून त्याची रेंज 400 किलोमीटरच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

भारताची पहिली मारुती सुझुकी इलेक्ट्रिक कार!
मारुती सुझुकी भारतात इलेक्ट्रिक कार घेऊन येण्याच्या तयारीत आहे. कंपनीची पहिली इलेक्ट्रिक SUV eVX असणार आहे. ही कार एका नवीन इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर बनवली जाणार असून दोन बॅटरी पर्यायांसह उपलब्ध होईल. 48 kWh च्या बॅटरी पॅक असलेल्या या कारची रेंज 400 किलोमीटर इतकी तर 60 kWh च्या बॅटरी पॅक असलेल्या कारची रेंज 550 किलोमीटर इतकी राहण्याची शक्यता आहे.

आलिशान शैलीमध्ये येणार Harrier ची इलेक्ट्रिक आवृत्ती!
2024 च्या इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्सपोमध्ये टाटा Harrier ची कॉन्सेप्ट इलेक्ट्रिक कार प्रदर्शित करण्यात आली होती. आता ही कार 2025 च्या ऑटो एक्सपोमध्ये भारतात पदार्पण करण्याची शक्यता आहे. ही इलेक्ट्रिक SUV OMEGA-Arc प्लॅटफॉर्मच्या इलेक्ट्रिक खास आवृत्तीवर आधारित असेल. सुमारे 60 kWh च्या बॅटरी पॅकने चालणारी ही कार एकदा चार्ज केल्यास 500 किलोमीटरची रेंज देऊ शकते.

Mahindra XUV.e8
महिंद्रा कंपनी त्यांच्या INGLO प्लॅटफॉर्मवर आधारित XUV.e8 ही इलेक्ट्रिक कार भारतात लाँच करण्याची तयारी करत आहे. 2025 च्या ऑटो एक्सपोमध्ये ही कार लाँच होण्याची शक्यता आहे. ही कार XUV700 ची इलेक्ट्रिक आवृत्ती असून 80 kWh च्या बॅटरी पॅकने चालणार आहे. 227 bhp ते 345 bhp इतक्या पॉवरमध्ये ही कार उपलब्ध होईल.

Kia EV9
किआ ईवी९ (Kia EV9): किआची आलिशान इलेक्ट्रिक SUV EV9 २०२३ च्या ऑटो प्रदर्शनात कॉन्सेप्ट स्वरुपात भारतात आली होती. आता कंपनीने या कारची भारतात लाँच करण्याची पुष्टी केली असून २०२५ च्या प्रदर्शनात ही कार लाँच होईल. आंतरराष्ट्रीय स्तरावर ही कार अनेक बॅटरी पर्याय आणि रेंज निवडणुकांमध्ये उपलब्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *