Lal Krishna Advani Health Update: लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली, युरोलॉजी विभागात उपचार सुरू

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ जुन ।। माजी उपपंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावलीय. त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. वयोमानानुसार त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. एम्सच्या युरोलॉजी विभागाचे प्राध्यापक डॉ. अमलेश सेठ त्यांच्यावर उपचार करत आहेत. लाल कुष्ण आडवाणी यांची नियमित तपासणी केली जात आहे. त्यांची तब्येत सध्या स्थिर आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार त्यांची प्रकृती स्थिर आहे.

लालकृष्ण अडवाणी यांचे वय ९६ वर्ष असून त्यांच्या वयाशी संबंधित समस्या लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना दाखल करण्यात आले आहे. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपची झालेल्या बैठकीत लालकृष्ण अडवाणी देखील उपस्थित होते. लालकृष्ण अडवाणी यांना यावर्षी ३० मार्च रोजी भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. अडवाणी यांचे वय आणि ढासळती प्रकृती लक्षात घेऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी हा सन्मान प्रदान करण्यात आला.

त्यावेळी पंतप्रधान मोदी उपस्थितीत होते. यावेळी माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू हे देखील उपस्थित होते. यापूर्वी २०१५ मध्ये अडवाणी यांना देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले होते.

लाल कृष्ण अडवाणी यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९२७ रोजी कराची येथे झाला होता. अडवाणी हे १९४२ मध्ये स्वयंसेवक म्हणून आरएसएसशी जुडले गेले. लालकृष्ण अडवाणी यांनी १९८६ ते १९९०, पुन्हा १९९३ ते १९९८ आणि २००४ ते २००५ या काळात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम केले आहे. सुमारे तीन दशकांच्या संसदीय कारकिर्दीत अडवाणी यांनी महत्त्वाची मंत्रीपदे भूषवली आहेत. ते गृहमंत्रीही राहिलेत. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात ते उपपंतप्रधान होते. २००९ च्या निवडणुकीआधी ते लोकसभेतील विरोधी पक्षनेते होते. २००९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत ते भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होते. मात्र या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *