Maharashtra Interim Budget 2024: राज्य सरकारकडून गृहिणींना मोठं गिफ्ट; गॅस सिलिंडर मोफत मिळणार; काय आहे नियम ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ जुन ।। आज अर्थमंत्री अजित पवार हे आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकारने मोठ मोठ्या घोषणा केल्या आहेत. दरम्यान यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना अधिक स्थान देण्यात आल्याचे पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकारकडून गृहिणींना मोठं गिफ्ट मिळालं आहे.

प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा अजित पवार यांनी यावेळी केली.

महिलांच्या आरोग्याच्या तक्रारी कमी करायच्या असतील तर सुरक्षित इंधन दिलं पाहिजे. एलपीजी गॅस प्रत्येक घराला देण्यासाठी प्रत्येक पात्र कुटुंबाला तीन गॅस सिलिंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना जाहीर करत आहेत. ५२ लाख १६ हजार ४०० कुटुंबांना लाभ मिळेल. पर्यावरण संरक्षण केलं जाईल, अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे.

तसेच राज्यसरकारने यंदा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. महिलांचे स्वावलंबन, पोषण अशा सर्वांगीन विकासासाठी या योजेअंतर्गत 21 ते 60 वर्षे वयाच्या पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येईल. यासाठी दरवर्षी 46 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात येईल. या योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून करण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *