महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पी. के. महाजन – पिंपरी चिंचवड – लाॅकडावुन चे दोन महिने सहीत जून संपूर्ण वीज बिल एकत्रित भरल्यास…. दोन टक्क्यांची सुट अशी घोषणाच नितीन राऊत यांनी मंगळवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केली ……ही सुट कितपत योग्य आहे? लाॅकडावुन मध्ये उत्पन्न च नव्हत तर एकत्रित बिल कोठून भरणार ? ….हि सुट म्हणजे सवलत आहे का थकबाकी वसुली चा मार्ग… बिलांचे पैसे लवकर मिळावेत म्हणून बँका ग्राहकाकडून मोठया कंपन्यांची बिले खरेदी करून 2% कमीशन घेवून पुर्ण पेमेंट करतात . पण तो बँकांचा व्यवसाय आहे. राज्य सरकारला सुट दयायची असेल तर ती 25% तरी असावी. तेव्हा कुठेतरी ग्राहकांना दिलासा मिळेल. नाहीतर दिल्ली सरकारने 200 युनिट पर्यंत सुट दिली तशी सुट द्यावी. तेव्हा गोर गरीबांना त्याचा फायदा होईल आणी सरकारने सवलत दिल्या सारखे वाटेल.
उर्जा मंत्री म्हणतात 3 हप्ते घ्या पुर्ण बिलांचे पेमेंट करा. नाहीतर तीन महीन्याची बिले एकदम भरा 2% सुट मिळेल…….हि कोणत्या प्रकारची सवलत आहे, ह्याच्यात जनतेला कोरोना संकटात कोणती मदत होते, 2% सुट म्हणजे हि सर्व सामान्य जनतेची एक प्रकारची चेष्टा च आहे. लाॅकडावुन च्या कालावधीतील विज बिले वसूल करण्या साठी हि शक्कल लढवली आहे. श्रीमंत लोक एकदम बिल भरतील ही पण गरीबाचे काय? ज्यांना लाॅकडावुन च्या कालावधीत कामच नव्हते ते कोठून भरणार एकदम बिले आणि तूमची सुट घेणार सरासरीने बिले आकारल्या मुळे मुळातच बिले जास्त आलेली आहेत. वीज महावितरणात वीज पुरवठा खंडीत झाल्यास तक्रार करायला गेलें तर आधी पुर्ण बिल भरा नंतर तक्रार घेऊ असे म्हणतात. म्हणजे चुकीने आलेली बिले आधी भरा नंतर तक्रार घेऊ…..ही पद्धत अन्याय कारक आहे हे सरकार च्या व ऊर्जामंत्री च्या लक्षात का येत नाही? साधी घरातली लाईट गेल्याची तक्रार करायला गेलें तरी हे विज वाले विचारतात आधी लाईटबील भरलय का? म्हणजे तुम्ही नियमीतपणे वीजबील भरता आणि शेवटच्या बिलाचा भरणा बाकी असेल तरी हे तक्रार घेत नाहीत इतकी मस्ती आली आहे या विज डिपारटमेंटला. अशा अन्याय कारक कारभारा मुळे आधीच जनता वैतागली आहे हया डिपारटमेंटला. त्या मुळे सरकारने अजून ही योग्य तो विचार करावा वेळ गेलेली नाही. जनतेला समाधानकारक न्याय द्यावा हिच अपेक्षा आहे. कारण कोरोना सारख्या महामारी मुळे जनता सध्या आर्थीक संकटात आहे…….पि.के. महाजन.