आयफोन युजर्ससाठी बातमी; ऍपलचे खास फीचर्स येतेय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ जुलै ।। ऍपल कंपनी हिंदुस्थानातील आपल्या युजर्ससाठी खास फीचर्स घेऊन येत आहे. ऍपलकडून लवकरच आयओओस 18 अपडेट रोलआऊट करण्यात येणार आहे. या अपडेटसोबत आयफोन युजर्ससाठी नवीन फीचर्स मिळणार आहे. यामुळे फोन एकदम स्मूथ चालवता येईल. यात कस्टमाइज ऑप्शनसारखे फोटो ऍप री-डिझाईन, ई-मेल इन-बॉक्स ऍप मेसेज मिळतील. आयओएस 18 मध्ये अनेक अतिरिक्त फीचर्स दिले जाणार आहेत. आयफोन कीबोर्डमध्ये आता 11 हिंदुस्थानी भाषांचा सपोर्ट मिळेल. यात मराठी, हिंदी, कन्नड, बांगला, मल्याळम, उडिया, पंजाबी, तामीळ, तेलुगू आणि उर्दू या भाषांचा समावेश आहे. सिरीला नऊ हिंदुस्थानी भाषांचा सपोर्ट मिळेल. सिरीला अलार्म आणि टायमर सेट करणे, ऍप लाँच करण्यासाठी कमांड दिले जाऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *