महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ जुलै ।। अनेक तरुणांचे शिक्षण पूर्ण झाले आहे. शिक्षण पूर्ण झाले असले तरीही नोकरी मिळत नाही अशा तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. ए आय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड येथे १०४९ रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह पदासाठी ७०६ जागा रिक्त आहेत. तर सिनियर सर्व्हिस एक्झिक्युटीव्ह या पदासाठी ३४३ जागांवर भरती कपण्यात येणार आहे. ही भरती महिला आणि पुरुष या दोन्ही उमेदवारांसाठी आहे.
एअरपोर्टवर नोकरीचा कालावधी तीन वर्षांचा असणार आहे. भारतीय नागरिक असलेले उमेदवारच या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. ही नोकरी कंत्राटी बेसिसवर असणार असून ३ वर्षांचा कालावधी असणार आहे. त्यानंतर उमेदवाराचा कामाचा अनुभव आणि कौशल्य लक्षात घेऊन पुढील कार्यकाळ ठरवला जाईल.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमाल ३३ वर्ष असायला हवे. ओबीसी प्रवर्गातील लोकांना तीन वर्षांची सूट देण्यात आली आहे तर एसटी आणि एससी प्रवर्गातील लोकांना ५ वर्षांची सूट देण्यात आली आहे.
या नोकरीसाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही शाखेतून पदवीधर असावा. त्याला कामाचा किमान ५ वर्षांचा अनुभव असावा. कॉम्प्युटर वापरायचे ज्ञान असायला हवे. त्याचसोबत इंग्रजी आणि हिंदी भाषेचे ज्ञान असायला हवे. या नोकरीसाठी तुम्हाला २८,६०५ रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
या नोकरीसाठी तु्म्हाला https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScA4WF8Ej8bKu7VwMMOzRhSoYuQSVjD9CFWYZynC_1llrUZVQ/viewform?pli=1 हा गुगल फॉर्म भरावा लागणार आहे.