Weather Update: राज्यात काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज ; पहा हवामान विभागाचा इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.५ जुलै ।। राज्याच्या अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे, काही भागात पावसाची प्रतीक्षा आहे, तर अनेक भागांमध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. आज देखील हवामान विभागाकडून (IMD)राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीवर हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांसह विविध भागात पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये विदर्भातील अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान विभागाकडून तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विजांच्या कडकाडाटासह पावसाची शक्यता आहे. पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

पुणे शहर परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर या ठिकाणी आज (शुक्रवारी) मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, पुणे शहर परिसरात ढगाळ वातावरण दिसून येत आहे, पुण्यासह, कोल्हापूरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्याचा काही भाग वगळता उर्वरित राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असेल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली होती.

कोणत्या भागात पावसाची शक्यता
पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात तसेच दक्षिण नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, दिंडोरी, निफाड, येवला, नांदगाव, चांदवड तालुक्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने आज सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, पालघरसह कोकण किनारपट्टी भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *