महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ जुलै ।। आयटीआर भरण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक करदात्याने आयटीआर भरणे अनिवार्य आहे. आयटीआर भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२४ आहे. ३१ जुलैआधी तुम्ही आयटीआर न भरल्यास तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.आयटीआर अर्ज भरल्यानंतर किती दिवसात तुमच्या बँक अकाउंटमध्ये रिफंड येऊ शकतो, याबाबत अनेकांना प्रश्न पडलेला असतो. याचबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
जर तुम्ही आयटीआर भरला असेल आणि तुमचा रिफंड अकाउंटला आला नसेल तर तुमचे पैसे कदाचित अडकले असू शकतात. मात्र, काही तांत्रिक कारणामुळे या गोष्टी होऊ शकतात. परंतु है पैसे लवकरच तुमच्या अकाउंटला जमा होतील.
आयकर विभाग सर्व सूट, कपात विचारात घेऊन मूल्यांकन कर मोजतो. यानंतरही जर तुमचे काही पैसे शिल्लक राहिल्यास आयकर विभाग ते रिफंड करतो. आयकर विभाग सर्व पडताळणी केल्यानंतरच हा परतावा देतो.
आयटीआर तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने भरु शकतात. जर तुम्ही आयटीआर ऑनलाइन पद्धतीने भरला असेल तर तुमचा परतावा रिटर्न येण्यासाठी १५ ते ४५ दिवस लागतात. जर तुम्ही ऑफलाइन पद्धतीने आयटीआर भरला असेल तर रिफंड येण्यास थोडा जास्त वेळ लागू शकतो.
रिफंड येण्यास प्रोब्लेम का येतो
जर तुम्ही तुमच्या बँक खाते नंबर चुकीचा भरला असेल किंवा फॉर्ममध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे न दिल्यामुळे, फॉर्म 26AS जुळत नसल्यामुळे किंवा काही टेक्नीकल प्रॉब्लेम झाल्यामुळे रिफंड परत येण्यास समस्या येते.
जर रिफंड अडकला असेल तर पुन्हा फॉर्म भरावा लागेल
रिफंड अडकल्यानंतर तो मिळवण्यासाठी तुम्हाला आयकर विभागाच्या ई- फायलिंग पोर्टवर लॉग इन करावे लागेल. त्यानंतर सर्व्हिस या टॅबवर क्लिक करा.रिफंड रिइश्यू या पर्यायावर क्लिक करा. ही पर्याय ड्रॉप डाउन मेन्यूमध्ये दिसेल. यानंतर रिफंड रिइश्यू रिक्वेस्ट बटणवर क्लिक करा. यानंतर तुमचा बँक खाते क्रमांक ही सर्व माहिती तपासून घ्या.यानंतर फॉर्म भरा. यानंतर तुमचे पैसे काही दिवसात तुमच्या अकाउंटला जमा होतील.