Whatsapp Tips : फक्त ‘ही’ ट्रिक वापरा ; समोरच्याने डिलीट केलेले व्हाट्सअ‍ॅप मेसेज वाचायला मिळतील

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ जुलै ।। Whastapp : व्हाट्सअ‍ॅप हे जगातील सर्वात जास्त वापरले जाणारे मेसेजिंग अ‍ॅप आहे. व्हाट्सअ‍ॅप वापरण्यास सोपे आहे आणि त्यामध्ये आपल्याला हव्या त्या अनेक सुविधा आहेत. व्हाट्सअ‍ॅपवर तुम्ही व्हिडिओ कॉल, व्हॉइस कॉल करू शकता, मेसेज पाठवू शकता, फोटो आणि व्हिडिओ शेअर करू शकता. अगदी लोकेशन शेअर करण्याची आणि पेमेंट करण्याचीही सोय आहे.

पण, व्हाट्सअ‍ॅपमध्ये एका फीचरमध्ये अडचण आहे. ती म्हणजे डिलीटेड मेसेज.व्हाट्सअ‍ॅपवर पाठवलेला मेसेज दोन दिवसांपर्यंत डिलीट करता येतो. पण समस्या अशी आहे की, मेसेज डिलीट केल्यावर चॅटमध्ये “This message was deleted” असा नोटिफिकेशन येतो. यामुळे मेसेज कोणते होते आणि त्यात काय लिहिल होत याबद्दल वाचणार्‍याची उत्सुकता वाढते.

इन्स्टाग्रामसारख्या अनेक सोशल मीडिया अॅप्समध्येही डिलीट मेसेज फीचर आहे पण तिथे मेसेज डिलीट झाल्याचे रिसीव्हरला कळत नाही. त्यामुळे व्हाट्सअ‍ॅपने हे फीचर अजून सुधारायला हवे.

मोबाईलवर व्हाट्सअ‍ॅप डिलीटेड मेसेज वाचण्यासाठी काय करावे?
आपण जर या डिलीटेड मेसेज वाचू इच्छित असाल तर काही थर्ड पार्टी अॅप वापरुन ते वाचू शकता.

1. गुगल प्ले स्टोरमधून “Get Deleted Messages” हे अॅप डाउनलोड करा.

2.अॅपला परवानगी द्या.

3.आता व्हाट्सअ‍ॅपवर जेव्हा एखादा मेसेज डिलीट होईल तेव्हा हे अॅप ओपन करुन तुम्ही तो मेसेज वाचू शकता.

हे अॅप तुमच्या फोनच्या नोटिफिकेशनमधील मेसेज वाचते आणि दाखवते. त्यामुळे नोटिफिकेशनची परवानगी द्यावी लागेल.जर तुम्ही व्हाट्सअ‍ॅप चॅट ओपन ठेवून एखादा मेसेज डिलीट झाला तर तो वाचता येणार नाही. कारण हे अॅप नोटिफिकेशनमधून मेसेज वाचू शकते.

पण थर्ड पार्टी अॅप किती सुरक्षित आहे हे सांगता येत नाही.त्यामुळे तुम्ही वापरत असताना कोणकोणत्या गोष्टींना अॅक्सेसची परवानगी देत आहात हे नीट अगदी काळजीपूर्वक पाहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *