Ravindra Waikar: रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट; सर्व गुन्हे मागे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ जुलै ।। रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांना मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) क्लीन चीट मिळाल्याची माहिती मिळत आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी (Jogeshwari Plot Scam Case) EOW कडून कोर्टात सी समरी रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. गैरसमजातून मुंबई महानगरपालिकेनं (Mumbai Municipal Corporation) गुन्हा दाखल केल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. त्यामुळे रविंद्र वायकरांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

मुंबई महानगरपालिकेकडून दाखल झालेली तक्रार गैरसमजातून केल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, रवींद्र वायकर त्यांच्या पत्नी मनिषा आणि त्यांचे भागीदार आसू नेहलानी, राज लालचंदानी, प्रिथपाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरूण दुबे यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

काय आहे रवींद्र वायकरांचं जोगेश्वरी भूखंड प्रकरण ?

जोगेश्वरीतल्या 13,674 चौरस फुटांच्या भूखंडाचा घोटाळा
2004 ला वायकर-मनपा-महल पिक्चर्समध्ये भूखंडासाठी करार
भूखंड मैदानासाठी आणि रूग्णालयासाठी होता आरक्षित
भूखंडाची किंमत अंदाजे 500 कोटी रुपये
राखीव भूखंडावर वायकरांकडून पंचतारांकित हॉटेलची उभारणी
हॉटेलच्या बांधकामासाठी मुंबई मनपाची परवानगीच नाही

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या काळात सार्वजनिक वापरासाठीचा राखीव भूखंड लाटून त्यावर पंचतारांकीत हॉटेल बांधण्याचा घाट घालून 500 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. या गैरव्यवहारातून पालिकेचा महसूल बुडवल्याचा आरोप करत पालिका अभियंता संतोष मांडवकर यांच्या तक्रारीवरून आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण आहे तरी काय?
मुंबईतील जोगेश्वरीच्या मजासवाडी भागात 13 हजार 674 चौरस फुटांचा भूखंड मुंबई महापालिकेच्या मालकीचा आहे. हा भूखंड मैदानासाठी आणि रूग्णालयासाठी आरक्षित ठेवण्यात आला होता. या भूखंडाची किंमत 500 कोटींच्या घरात आहे. या राखीव भूखंडावर रविंद्र वायकर यांनी 5 स्टार हॉटेल बांधलं असल्याचा आरोप आहे.

विशेष म्हणजे या बांधकामासाठी वायकर यांनी मुंबई महाापालिकेकडून परवानगी घेतली नव्हती, असा त्यांच्यावर आरोप आहेत. या प्रकरणी रविंद्र वायकर यांची चौकशी सुरु आहे. चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भात नोटीस देण्यात आली होती. मात्र वायकर या चौकशीला हजर राहिले नाहीत. त्यानंतर आता ईडीकडून वायकर यांच्या घरावर धाड टाकण्यात आली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *