महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ जुलै ।। उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अमरनाथ यात्रा शनिवारी गुहा मंदिराच्या दोन्ही मार्गांवर तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. यात्रा सुरू झाल्यापासून गेल्या ७ दिवसांत दीड लाख भाविकांची अमरनाथ यात्रेत हजेरी लावल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून यात्रा तात्पुरती स्थगित
काल रात्रीपासून बालटाल आणि पहलगाम मार्गांवर अधूनमधून मुसळधार पाऊस पडत आहे. यात्रेकरूंच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून यात्रा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
Amarnath Yatra 2024: बालटाल और पहलगाम में भारी बारिश, रोकी गई अमरनाथ यात्रा; अभी तक इतने श्रद्धालु कर चुके दर्शन। #AmarnathYatra2024 #AmarnathYatra #Rain #JammuKashmir https://t.co/QAuWYjQClp pic.twitter.com/4YDqUZrLCf
— Dainik Jagran (@JagranNews) July 6, 2024
आतापर्यंत 1.50 लाख भाविकांनी घेतले दर्शन
अमरनाथ यात्रा २९ जून रोजी अनंतनागमधील पारंपारिक 48 किमीचा नुनवान-पहलगाम मार्ग आणि गांदरबलमधील 14 किमीचा लहान पण उंच बालटाल मार्गापासून सुरू झाली आणि 19 ऑगस्ट रोजी संपेल. यंदा अमरनाथ यात्रेसाठी देशभरातील 1.50 लाखांच्या पुढे भाविकांची आत्तापर्यंत भेट दिली आहे. तर गेल्यावर्षी 4.5 लाखांहून अधिक यात्रेकरूंनी अमरनाथमधील गुहेतील शिवलिंगाचे दर्शन घेतले होते.