Central Railway : रेल्वे प्रवाशांसाठी ! मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक तडकाफडकी रद्द, नेमकं कारण काय?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ जुलै ।। रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी आहे. मध्य रेल्वेची वाहतूक आज पहाटेपासुन पडणाऱ्या पावसामुळे काही काळ रद्द करण्यात आली होती. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. आज पडणाऱ्या पावसामुळे रेल्वेच्या वतीने घेण्यात आलेला ठाणे ते दिवा येथील मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे.

मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक रद्द
पावसामुळे मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक रद्द आल्यामुळे आता लांब पल्ल्याच्या गाड्या पुन्हा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळालेला (Mumbai Local News) आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस सुरू आहे. याचा फटका मध्य रेल्वेला देखील बसत आहे. परंत मेगाब्लॉक रद्द केल्याने प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे. अनेकांच्या प्रवासाचा मार्ग मोकळा झालाय.

मध्य रेल्वेची वाहतूक
जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडपडीच्या, पाणी साचल्याच्या घटना समोर येत (Thane To Diva Mega block) आहे. तर रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू होती. त्यातच ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे आसनगाव ते कसारा या मार्गावरील वाहतूक देखील सकाळी पूर्णत: ठप्प झाली होती. त्यामुळे लोकसेवा बंद करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला होता.

पावसाचा वाहतूकीवर परिणाम
पनवेल परिसरात देखील सकाळ पासून मुसळधार पाऊस (Central Railway Mega Block) आहे. तर कळंबोली परिसरातील रस्ते पाण्याखाली गेलेत. कळंबोलीत रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय. रस्त्यावर पाणी साचल्याने गाड्या अडकल्या आहेत. कार , परिवहन बस बंद पडल्या. आता पावसाने थोडी उसंत घेतली असल्याने परिस्थिती नियंत्रणात येण्यास सुरुवात (Central Railway) झालीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *