पावसाळ्यात या ५ आजारांचा वाढतो धोका, व्हा अलर्टं

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.१० जुलै ।। पावसाळा सुरू झाला. सर्वत्र पावसाच्या अगदी जोरदार सरी कोसळत आहेत. पावसामुळे उन्हाची काहिली कमी झाली आहे. लोकही या पावसात मजा-मस्ती करताना दिसत आहेत.

या मोसमात पावसामुळे ठिकठिकाणी पाणी भरते. यामुळे डासांची पैदास होऊ लागते. दरम्यान, डास आणि अनेक ठिकाणी तुंबलेल्या पाण्यामुळे आजार पसरण्याचा धोकाही तितकाच वाढतो.

पावसाळ्याच्या दिवसांत डास चावल्याने डेंग्यू आजाराचे प्रमाण वाढते. पावसाळ्यातील हा एक सामान्य आजार आहे. डेंग्यू हे एक व्हायरल इन्फेक्शन असते ज्यामुळे ताप, अंगदुखीचा त्रास होतो.

डेंग्यूशिवाय डास चावल्याने चिकनगुनियाचा त्रासही होऊ शकतो. पावसाळ्याच्या दिवसांत मलेरियाची प्रकरणेही अनेक पाहायला मिळतात. या मोसमात खराब पाणी प्यायल्याने टायफॉईडचाही त्रास होऊ शकतो.

अशी घ्या काळजी
पावसाळ्यात घराजवळ पाणी तुंबणार नाही याची काळजी. पाणी तुंबणारी ठिकाणे स्वच्छ आणि कोरडी ठेवा.

पावसाळ्यात पाणी नेहमी उकळून तसेच गाळून प्या.

पौष्टिक आणि ताजे अन्न खा.

पुरेसे पाणी प्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *