Pune News: पुणेकरांनो दारू पिऊन वाहन चालवणं पडणार महागात, लायसन्स कायमस्वरूपी होणार रद्द

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.१० जुलै ।। पुणेकरांसाठी (Punekar) महत्वाची बातमी समोर आली आहे. पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून हिट अँड रनची प्रकरणं (Pune Hit And Run Case) खूपच वाढली आहेत. यावरून आता पुणे वाहतूक पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. यापुढे दारू पिऊन वाहन चालवणं पुणेकरांना महागात पडणार आहे. दारू पिऊन कार किंवा बाइक चालवल्यास वाहन चालकांचे लायसन्स कायमस्वरूपी रद्द होण्याची शक्यता आहे अशी माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकांविरोधात आता चांगलीच कारवाई होणार आहे. पहिल्या वेळेस दारू पिऊन वाहन चालविल्यास तीन महिन्यासाठी चालकाचे लायसन्स रद्द केली जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या वेळेस देखील दारू पिऊन वाहन चालविल्यास सहा महिन्यासाठी चालकाचे लायसन्स रद्द केले जाणार आहे. तर तिसऱ्या वेळेस जर दारू पिऊन पुन्हा वाहन चालवल्यास चालकाचे लायसन्स कायमस्वरूपी रद्द होऊ शकते.

पुण्यातील बहुचर्चित कल्याणी नगर कार अपघात प्रकरण, रविवारी पुण्यातील बोपोडी या ठिकाणी झालेले हिट अँड रन प्रकरण आणि फरसखाना पोलिस स्थानकाच्या सहाय्यक पोलिस निरीक्षकांना दारू पिऊन पेटवून देणाचा प्रयत्न करण्याच्या वाहन चालकाच्या धक्कादायक प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या पुढे दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांना चांगलाच चाप बसणार आहे.

यापूर्वी पुण्यामध्ये दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांविरोधात सौम्य स्वरूपाची कारवाई होऊन त्यावर न्यायालयाकडे खटला पाठवला जायचा. पण आता दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या पुणेकरांवर चांगलीच कारवाई केली जाणार आहे. पुणे पोलिस या सगळ्याची अंमलबजावणी कठोर पद्धतीने करणार असून त्यांचे लायसन रद्द करण्याचा प्रस्ताव न्यायालयाकडे पाठवणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *