Konkan Railway: मुसळधार पावसामुळे कोकणात जाणाऱ्या ट्रेन रद्द, ‘या’गाड्यांचा मार्ग बदलला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.१० जुलै ।। राज्यात संततधार पावसाने हजेरी लावलीय. कोकणात दरड कोसळण्याच्या घटना समोर आल्या आहेत. याचा परिणाम वाहतुकीवर झाल्याचं दिसत आहे. गाडी क्र. १९५७७ तिरुनेलवेली – जामनगर एक्स्प्रेस ही गाडी शोरानूर जंक्शन मार्गे वळवली गेली आहे. इरोड जं.- धर्मावरम गुंटकल जं. रायचूर वाडी सोलापूर जं. पुणे जं. लोणावळा-पनवेल आणि पुढील मार्गावरून (Konkan Railway) जाईल.

‘या’ गाड्यांचा मार्ग बदलला :
गाडी क्र. १६३३६ नागरकोइल – गांधीधाम एक्सप्रेस उडुपी येथे पाठीमागे जाईल आणि शोरानूर जंक्शन मार्गे वळवण्यात येईल. ही गाडी इरोड जं. धर्मावरम गुंटकल, जं. रायचूर वाडी सोलापूर, जं. पुणे, जं. लोणावळा-पनवेलमार्ग जाणार आहे. ट्रेन क्र. १२२८३ एर्नाकुलम – एच. निजामुद्दीन शोरानूर जंक्शन मार्गे वळवला जाईल. इरोड जं., धर्मावरम गुंटकल जं, रायचूर वाडी सोलापूर, पुणे जंक्शनवरून लोणावळा पनवेल मार्गे ( Latest Train Update) जाईल.

गाडी क्र. २२६५५ एर्नाकुलम – एच. निजामुद्दीन एक्स्प्रेस थलास्सेरी येथे पाठवली जाईल, ही गाडी शोरानूर जंक्शनमार्गे वळवला जाईल. इरोड जंक्शन, धर्मावरम गुंटकल जं., रायचूर – वाडी सोलापूर जं., पुणे जं. लोणावळा-पनवेल मार्गे जाणार आहे. गाडी क्र. १६३४६ तिरुवनंतपुरम सेंट्रल लोकमान्य टिळक (टी) एक्सप्रेस तिरुअनंतपुरम सेंट्रल येथून ४ वाजून ५५ मिनिटांनी पुन्हा शेड्यूल (Heavy Rain) आलीय. शोरानूर जंक्शन मार्गे वळवला गेली आहे. ही ट्रेन इरोड जं.- धर्मावरम- गुंटकल जं. रायचूर- वाडी- सोलापूर जं. – पुणे जं. लोणावळा-पनवेल मार्गे जाणार आहे.

कोणत्या गाड्या रद्द?
गाडी क्र.१२४४९ मडगाव जंक्शनपासून सुरू होणारा चंदीगड एक्सप्रेसचा प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे. गाडी क्र. १२६२० मंगळुरु मध्य लोकमान्य टिळक (टी) रद्द करण्यात आलीय. ट्रेन क्र. १२१३४ मंगळुरु मुंबई CSMT एक्सप्रेस रद्द करण्यात आलीय. गाडी क्र. ५०१०७ सावंतवाडी रोड मडगाव जंक्शन रद्द करण्यात आलीय. गाडी क्र. २०१११ मुंबई सीएसएमटी मडगाव जं.कोकणकन्या एक्स्प्रेसचा प्रवास सावंतवाडी रोड येथे अल्पावधीत समाप्त होईल. सावंतवाडी रोड – मडगाव जंक्शन दरम्यान अंशतः रद्द केला जाईल. गाडी क्र. १२६१९ लोकमान्य टिळक (टी) – मंगळुरु सेंट्रल मत्स्यगंधा एक्स्प्रेसचा प्रवास ०९/०७/२०२४ रोजी सावंतवाडी रोड येथे अल्पावधीत समाप्त होईल. सावंतवाडी रोड – मंगळुरू सेंट्रल दरम्यान अंशतः रद्द केला जाईल.

रत्नागिरीमध्ये दरड कोसळली
रत्नागिरी जिल्ह्यात कोसळणाऱ्या अतिमुसळधार पावसामुळे मंडणगड बाणकोट रस्त्यावरील तुळशी घाटात दरड कोसळण्याचे सत्र सुरूच आहे. या मार्गावर तुळशी घाटात वारंवार दरड कोसळून वाहतूक ठप्प होत (Ratnagiri Landslide) आहे. मंडणगड ते अंबडवे यादरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे काम करण्यात आले. त्यामुळे रस्ता रुंदीकरणासाठी डोंगर कटिंग करण्यात आले होते. त्यामुळे सतत या डोंगराची दरड कोसळत असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.

रत्नागिरीत पडणाऱ्या संततधार पावसाचा फटका मुंबई गोवा महामार्गाला देखील बसला होता. सोमवारी या महामार्गावर चिपळूण परशुराम घाटामध्ये काही प्रमाणात दरड कोसळली होती. माती आणि मुरूम रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. तर संततधार पावसातच दरड हटविण्याचं काम करण्यात आलं होतं.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *