![]()
महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. १८ जानेवारी |
मेष राशिभविष्य (Aries Horoscope)
पारमार्थिक उन्नतीला प्राधान्य द्याल. कर्मठ पणे मत मांडाल. वडिलधाऱ्यांचा योग्य तो मान ठेवावा. सेवावृत्तीने कामे कराल. कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope)
आरोग्याबाबत हयगय करू नये. प्रतिकुलतेतून मार्ग काढाल. विरोधकांवर लक्ष ठेवावे. काही गोष्टींमध्ये संयम बाळगावा लागेल. मानसिक स्थैर्य जपावे.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope)
वाणीतील गोडवा जपावा. आवडीचे पदार्थ चाखायला मिळतील. जोडीदाराच्या संयमाचे कौतुक कराल. शांतपणे विचार करावा. वैचारिक प्रौढता दाखवाल.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope)
वैवाहिक सौख्यात भर पडेल. उदार मतवादी असाल. आळस दूर सारावा. कामाचे समाधान मिळेल. कणखरपणे आपले विचार मांडावेत.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope)
व्यावहारिक दृष्टीकोन ठेवाल. मुलांशी वादाचे प्रसंग टाळावेत. ज्ञानाचा योग्य वापर करण्याची संधी मिळेल. मानसिक व्यग्रता टाळावी. सखोल ज्ञानावर भर द्याल.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope)
स्त्री सहवासात रमाल. सामाजिक दर्जा सुधारण्यास मदत होईल. सतत प्रयत्नशील रहाल. शांत, निवांत वातावरणात रमाल. चांगले गृहसौख्य लाभेल.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope)
मानाने पैसा कामवाल. पराक्रमाला चांगला वाव मिळेल. सामाजिक गोष्टीत पुढाकार घ्याल. मुलांच्याबाबत दक्षता बाळगावी. प्रवास चांगला होईल.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope)
स्वत:चे स्थान टिकवण्याचा प्रयत्न कराल. स्थावरची कामे निघतील. काटकसरीने वागाल. कौटुंबिक जबाबदारीची जाणीव ठेवून वागाल. जुन्या कामात वेळ जाईल.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope)
कामातील अडथळे दूर सारावेत. आपला दर्जा सुधारण्याचा प्रयत्न कराल. चिकाटीने कामे हाती घ्याल. निराशा दूर सारावी. तुमची वागणूक आदर्श असेल.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope)
राहणीमान उंचावण्याचा प्रयत्न कराल. जोडीदाराच्या निश्चयावर खुश असाल. वैवाहिक सौख्यात भर पडेल. सहकुटुंब प्रवासाचे बेत आखाल. खर्चावर नियंत्रण ठेवावे.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope)
कामाचा उरक चांगला असेल. आरोग्यात सुधारणा होईल. कार्यपद्धतीत सुधारणा कराल. व्यावसायिक लाभावर लक्ष ठेवा. जुने मित्र भेटतील.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope)
बौद्धिक गोष्टीत लक्ष घालाल. आवडती वस्त्रे खरेदी कराल. चोखंदळपणा दर्शवाल. मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर लक्ष ठेवा. स्वत:च्या मतावर आग्रही राहाल.