महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.१० जुलै ।। मुंबई गोवा महामार्गावर तीन दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. गर्डर टाकण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. जर तुम्ही या काळात मुंबई गोवा महामार्गावर जाणार असाल तर तसे नियोजन करा. कोलाड जवळच्या म्हैसदरा नदीवर नवीन पुल बांधला जाणार आहे. या पुलासाठी पाच गर्डर टाकले जातील. हे काम ११ जुलै ते १३ जुलै दरम्यान होणार आहे. या कामासाठी तीन दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या महामार्गावरची वाहतूक सकाळी ६ वाजल्यापासून सकाळी ८ आणि दुपारी २ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या मेगाब्लॉकच्या काळात प्रवाशांना वाकण पाली मार्गे माणगाव असा प्रवास करावा लागणार आहे.