Jio, Airtel आणि Vi ला करावे लागणार ‘हे’ महत्त्वाचे काम, सरकारच्या नव्या सूचना

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.१० जुलै ।। ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणने (TRAI) नवे पाऊल उचलले आहे. त्यामुळे TRAI ने आता सर्व टेलिकॉम कंपन्यांना स्पॅम कॉलसाठी तक्रारी दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे.

TRAI वेळोवेळी आपले नियम बदलत असते आणि दूरसंचार कंपन्यांना त्याचे पालन करावे लागते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका नवीन सूचनेबद्दल सांगणार आहोत, जी एअरटेल, जिओ आणि व्होडाफोनला देण्यात आली आहे. आता कंपन्यांनाही ही सूचना मान्य करावी लागणार आहे.

TRAI च्या नव्या सूचना
TRAI नेही याबाबत कंपन्यांना सूचना दिल्या आहेत. TRAI चे म्हणणे आहे की सर्व कंपन्यांनी त्यांचे ॲप्स आणि वेब पोर्टल सुधारण्यासाठी काम केले पाहिजे.

ॲप्स चांगले तयार करा
दरम्यान, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी कंपन्यांना असे करण्यास सांगितले आहे. TRAI चे म्हणणे आहे की, वापरकर्त्यांना स्पॅम कॉलची तक्रार करणे सोपे होईल, अशा प्रकारे कंपन्यांनी पोर्टल आणि ॲप्स तयार केले पाहिजेत.

स्पॅम कॉल्स थांबवण्याची गरज
स्पॅम कॉल्स थांबवण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. अशा कॉल्सना Unsolicited Commercial Communication (UCC) असेही म्हणतात. यामुळेच TRAI ने तक्रार नोंदणी अधिक सोपी करावी, अशा सूचना दिल्या आहेत.

TRAI चे म्हणणे काय?
याचबरोबर, TRAI चे म्हणणे आहे की, कॉल लॉग सारख्या पर्यायांसह, वापरकर्त्यांना असे पर्याय देखील दिले पाहिजेत, जे त्यांना तक्रारी नोंदवण्याची परवानगी देतात. त्यामुळे यंत्रणेत पारदर्शकता येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *