Euro Cup 2024 : इंग्लंडची Euro Cupच्या फायनलमध्ये धडक : ट्रॉफीसाठी ‘या’ दिवशी स्पेनशी भिडणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.११ जुलै ।। Euro Cup 2024 semis England vs Netherlands : ओली वॅटकिन्सने शेवटच्या क्षणी केलेल्या गोलमुळे इंग्लंडने युरो 2024 च्या उपांत्य फेरीत नेदरलँड्सविरुद्ध 2-1 असा विजय मिळवून युरो 2024 च्या अंतिम फेरीत धडक मारली. आता विजेतेपदाच्या लढतीत त्यांचा सामना तीनवेळचा चॅम्पियन स्पेनशी होणार आहे. फ्रान्सचा पराभव करून स्पेनने अंतिम फेरी गाठली होती.

या मॅचमध्ये इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नव्हती, कारण झेवी सिमन्सने नेदरलँडसाठी पहिला गोल केला. मात्र, इंग्लंडनी सामना 2-1 असा जिंकून शेवट चांगलाच केला. इंग्लंडने सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. शेवटच्या वेळी 2021 मध्ये इटलीविरुद्ध विजेतेपदाच्या लढतीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.

नेदरलँडविरुद्ध खराब सुरुवातीनंतर हॅरी केनने पुनरागमनाचा पाया रचला. जर्मन रेफ्री फेलिक्स झ्वेअरने व्हीएआर कॉल केल्यानंतर हॅरी केनच्या पेनल्टीमुळे इंग्लंडने 1-1 अशी बरोबरी साधली आणि अतिरिक्त वेळेत वॉटकिन्सने केलेल्या शानदार गोलने त्यांना विजय मिळवून दिला.

गॅरेथ साउथगेटच्या इंग्लंड संघाने सलग दुसऱ्यांदा युरोपियन चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचले आहेत आणि ते 1966 नंतर पहिली मोठी ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पाहत आहेत. युरो 2024 चा विजेतेपदाचा सामना रविवारी 14 जुलै रोजी इंग्लंड आणि स्पेन यांच्यात होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *