दिशा सालियन मृत्यूप्रकरणी पुरावे देणार ; मुंबई पोलीस उद्या करणार चौकशी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.११ जुलै ।। दिशा सालियन मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांनी भाजपचे आमदार नितेश राणे यांना समन्‍स बजावले आहे. शुक्रवारी त्‍यांना मालवणी पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले आहे. मला नुकतेच समन्स मिळाले आहे.मी मुबंई पोलिसांना सर्व योग्य ते पुरावे देणार आहे, असे नितेश राणेंनी म्‍हटलं आहे.

8 जून 2020 रोजी दिशा सालियन मृतावस्थेत सापडली होती. यानंतर काही दिवसांनी सुशांतनेही मुंबईतील वांद्रे येथील फ्लॅटमध्ये आपले जीवन संपवले होते. दिशाची हत्‍या झाल्‍याचा दावा नितेश राणे यांनी केला होता. आता त्यांच्या दाव्यांबाबत मुबंई पोलीस चौकशी करणार आहेत. नितेश राणे यांच्‍याकडे काही पुरावे असल्यास ते सादर करण्यास सांगितले जाईल.

दिशा सालियनच्या मृत्यूच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी गेल्या वर्षी तीन सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले होते. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती.

मुंबई पोलिसांना सहकार्य करणार : नितेश राणे
मला नुकतेच समन्स मिळाले आहे. मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे की दिशा हिची हत्‍या झाली आहे. या प्रकरणी मी मुंबई पोलिसांना सहकार्य करण्यास तयार आहे. महाविकास आघाडी सरकारला या प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्‍तांवर दबाव होता. आदित्‍य ठाकरे यांचे वडील मुख्‍यमंत्री होते. म्‍हणून सत्‍य दडपण्‍यात आले, असा आरोपही नितेश राणे यांनी केला. यापूर्वीही दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आम्हाला चौकशीसाठी बोलावलं होतं. मी मुबंई पोलिसांना सर्व योग्य ते पुरावे देणार आहे. काही महत्त्वपूर्ण पुरावे आदित्य ठाकरे संदर्भातही मुंबई पोलिसांना मिळाले आहेत”, असा मोठा दावा नितेश राणे यांनी माध्‍यमांशी बोलताना केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *