महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – ओमप्रकाश भांगे – पुणे – सोन्याच्या दराने आपल्या नव्या विक्रमी पातळीला गवसणी घातल्यानंतर सलग चौथ्या दिवशी सोमवारी सोने स्वस्त झाले. जागतिक बाजारात रुपयाचे मूल्य वधारल्याने स्थानिक बाजारात दबाव निर्माण होऊन सोन्याच्या किंमती कमी झाल्याचे बोलले जात आहे. सोन्याच्या डिलिव्हरी किंमतीमध्ये 0.34 टक्यांची घट होऊन 10 ग्रॅम सोन्याचा दर 47 हजार 882 रुपये खाली आला. शनिवारी हा दर 48 हजार 171 रुपयांवर होता.
सोन्याने गेल्या आठवड्यात 48 हजार 982 रुपयांची विक्रमी पातळी गाठली होती. तर दुसरीकडे जुलैमध्ये डिलिव्हरी होणार्या चांदीच्या चउदमध्ये 0.36 टक्क्यांनी घट होऊन प्रतिकिलो चांदीचा दर 49 हजार रुपयांपर्यंत खाली आला. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जगभरात मंदीचे सावट आहे, अशात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे.