Rain: पुण्यात , मुंबईत पहाटेपासूनच मुसळधार पाऊस; लोकल सेवा धीम्या गतीने, प्रवाशांची मोठी तारांबळ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ जुलै ।। पुण्यात आज सकाळपासून काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू (Pune Rain) आहे. पण हवामान विभागाच्या अंदाजानुसार यावर्षी चांगल्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पण जून महिन्यापासून अद्याप चांगला पाऊस झालेला नाही. धरण क्षेत्रात देखील अजून जोरदार पाऊस झालेला नाही. पण आता पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

काल हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस शहरात ठिकठिकाणी कोसळला. पुण्यात १४ जुलैपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी (Monsoon Update) कोसळतील, असा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला. पुण्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली होती.

मुंबईत आज सकाळपासूनच शहरात जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबईसह उपनगरामध्ये आज १३ जूलै रोजी शनिवारी पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालीय. संततधार पाऊस कोसळत असल्यामुळे कामावर निघालेल्या चाकरमान्यांना मोठा खोळंबा (Mumbai Rain) झालाय. सध्या नवी मुंबई, ठाणे, कल्याण, दादर, भिवंडीसह परिसरामध्ये जोरदार पाऊस कोसळत असल्याचं समोर आलंय. पावसाचा परिणामी लोकल ट्रेनवर झालाय. लोकल धीम्यागतीने सुरू आहेत.

दादर परिसरात मुसळधार पावसाची हजेरी
पावसामुळे लोकलदेखील काही मिनिटांनी उशिरा धावत (Rain Latest Update) आहेत. दादर परिसरात देखील मुसळधार पावसाने हजेरी लावलीय. मुंबई उपनगरात काल देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. जोरदार पावसामुळे किंग सर्कल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली होती. काल पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे किंग सर्कल भागात पाणीच पाणी झाल्याचं समोर आलं होतं. दादरकडून चेंबूरकडे जाणारी वाहतूक देखील मंदावली होती. ठाण्यात देखीस सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाल्याचं दिसतंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *