महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ जुलै ।। माळीनगर (ता.माळशिरस) येथे आज (दि. १३) सकाळी पावणे नऊ वाजता जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे पहिले उभे रिंगण हरिरामाच्या गजरात मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी अश्वांनी रिंगणाच्या दोन फेऱ्या पूर्ण केल्यानंतर वातावरण भक्तीमय झाले होते.
दरम्यान माळीनगर नगरीत संत तुकाराम महाराजांच्या पहिल्या उभ्या रिंगणाची उत्सुकता सर्वांना लागून होती. या रिंगण सोहळ्यासाठी माळीनगरीत भल्या सकाळी वारकऱ्यांनी गर्दी केली होती. यावेळी विठुरायाला भेटण्याच्या जिद्दीने वारीत सहभाही झालेल्या दिव्यांग वारकरी महिलाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तसेच वारकरी शारीरिक अडचणींवर मात करत आनंदाने वारीत सहभागी होत आहेत.