महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – देशातील इंधन दर जागतिक बाजाराशी सलग्न करण्यात आले आहेत. त्यामुळे दररोज सकाळी ६ वाजता कंपन्या पेट्रोल आणि डिझेलचा भाव निश्चित करतात. सध्या जागतिक बाजारातला क्रूडचा भाव ४० डाॅलरच्या आसपास असल्याने देशातील पेट्रोल आणि डिझेल महागच आहे. त्यात केंद्र आणि राज्य सरकारचा कर लादलेला आहे. कंपन्यांना आता इंधन दरात कपात करावी अशी मागणी केली जात आहे.
तेल वितरक कंपन्यांनी ७ जूनपासून दरवाढीचा सपाटा लावला होता. यावर नागरिकांमध्ये संतापाची लाट होती. याशिवाय विरोधी पक्षांनी सरकारविरोधात आंदोलनाची हाक दिली होती. गेल्या आठवड्या पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात रस्त्यावर आंदोलने झाली. गेल्या सोमवारी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलमध्ये शेवटची दरवाढ केली होती. त्यानंतर सलग सात दिवस इंधन दर स्थिर ठेवले आहेत. याआधी गेल्या सोमवारी पेट्रोलमध्ये ५ पैसे आणि डिझेलमध्ये १३ पैसे वाढ केली होती.
इंडियन ऑइलच्या दर पत्रकानुसार मंगळवारी मुंबईत पेट्रोलचा भाव प्रती लीटर ८७.१९ रुपयांवर कायम आहे. तर डिझेल २२ पैशांनी महागले असून प्रती लीटर भाव ७९.०५ रुपये झाला आहे. मंगळवारी तो ७८.८३ रुपये होता. राजधानी दिल्लीत पेट्रोलचा भाव ८०.४३ रुपयांवर स्थिर आहे. डिझेलचा भाव ८०.७८ रुपये प्रती लिटर झाला आहे. चेन्नईत पेट्रोल ८३.६३ रुपये आणि कोलकात्यात ८२.१० रुपये आहे. चेन्नईत डिझेल ७७.९१ रुपये आणि कोलकात्यात ७५.८९ रुपयांपर्यंत वाढले आहे.