अंध व्यक्तीच्या वडिलोपार्जित शेतजमिनीवर गावगुंडांचे अतिक्रमण ; मानसिक तणावाखाली हृदविकाराच्या झटक्याने दुःखद निधन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – शेतकरी दिनकर रामचंद्र गायकवाड ( अंध ) राहणार पिंपरी चिंचवड आमची शेती सर्वे न. १८० / १८१ / १८२ , सर्वे न. ३४. चिंचोली गावठाण जुने राहते घर खोली क्रमांक ३१० आणि देहूरोड चिंचवड वडिलोपार्जित जागेमध्ये अतिक्रमण केल्याबाबत समज देण्याबाबत गाव गुंडा विरोधात वारंवार तक्रार संबधित देहूरोड पोलिस स्टेशन , पोलिस सहायक आयुक्तालय , पिंपरी चिंचवड सी पी ऑफिस , दि. १५ जानेवारी , देि. २३ जानेवारी , दि. ५ मार्च , दि. ३ एप्रिल , दि.७ एप्रिल , व आज दि. ४ जुलै २०२० पर्यंत अजूनही या गोष्टीचा न्याय मिळाला नाही.

त्या विषयाला घेऊन दिनकर रामचंद्र गायकवाड खूप दिवसांपासून टेन्शन मध्ये होते .न्याय प्रक्रियेमध्ये विलंब होत असल्याने मानसिक तणावाखाली आज दि.४ जुलै २०२० रोजी  दिनकर रामचंद्र गायकवाड यांचे हृदविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले या गोष्टीचा आतातरी आम्हाला न्याय मिळेल का अशी मागणी त्यांच्या नातेवाईकांकडून होत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *