Special St Bus For Pandharpur: आषाढीसाठी १९५ बसची व्यवस्था; सवलतीही मिळणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ जुलै ।। Pandharpur Latest News: आषाढी एकादशीच्या पंढरपूर यात्रेसाठ एसटी महामंडळाच्या परभणी विभागाने परभणी व हिंगोली या दोन जिल्हयासाठी विशेष बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी १९५ बसची व्यवस्था महामंडळाने केली आहे. विशेष म्हणजे जेष्ठ नागरिक, महिला अपंग यांनाही त्यांच्या सवलती मिळणार आहेत.

दरवर्षी एसटी महामंडळ पंढरपूर यात्रेसाठी प्रवाशांची पंढरपूरकडे जाण्याची सोय व्हावी व त्यांच्या प्रवास सुखकर व्हावा यासाठी विशेष बस सोडत असते. परभणी जिल्ह्यासह हिंगोली जिल्ह्यातूनही विशेष बस सोडण्यात येतात.

यातून महामंडळाचे उत्पन्न तर वाढतेच परंतु, ग्रामीण भागातील प्रवाशांचा प्रवास सुखकर होत असतो. यंदाही आषाढी एकादशी निमित्त एसटी महामंडळाने विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

परभणी व हिंगोली या दोन जिल्ह्यातून पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी जाणाऱ्या भाविक आणि वारकऱ्यांसाठी जवळपास १९५ विशेष बसचे नियोजन केले आहे. नियमित बसफेऱ्यावर कोणताही परिणाम न होऊ देता महामंडळाने हे नियोजन केले आहे. परभणी व हिंगोली जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, गंगाखेड, पाथरी या चार आगारासह हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, वसमत, कळमनुरी या तीन आगारातून विशेष बसगाड्या सोडल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे यंदा महामंडळाकडून दिल्या जाणाऱ्या सर्व सवलती देखील या यात्रा स्पेशल बसला लागू असणार आहेत.

त्यात ७५ वर्षावरील जेष्ठ नागरीकांना मोफत प्रवास, महिलांना प्रवासात ५० टक्के सवलत, अपंगांना त्यांच्या नियमाप्रमाणे तिकिट दरात सवलत मिळणार आहे. भाविकांना पंढऱपुर येथे जाता यावे यासाठी एसटी महामंडळ परभणी जिल्ह्यातील परभणी, गंगाखेड, पाथरी यासह अन्य ठिकाणावरून तसेच आगारातून थेट पंढरपूरला बस सोडली जाणार आहेत. पुरेसे प्रवासी मिळाल्यास

गावातून सेवा
पुरेसे प्रवासी मिळाल्यास ज्या गावातून एसटीची मागणी केली आहे. त्यागावातून एसटी बसची सेवा प्रवाशांना दिली जाणार आहे. एकाच गावातील पुरेशा प्रवाशांना त्यासाठी नोंदणी करावी लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *