Maharashtra Weather Update: राज्यात आज या ६ जिल्ह्यांना पावसाचा रे़ड अलर्ट ; IMD अंदाज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९जुलै ।।  राज्यात सध्या चांगला पाऊस पडत असल्याचं चित्र आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांना अतिमुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वादळाचा इशारा दिलाय. रेड अलर्ट अंतर्गत रत्नागिरी, सातारा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे. दरम्यान, रायगड, कोल्हापूर आणि इतर दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे हवामान खात्याने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केलाय.

वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पावसाची शक्यता
रेड अलर्ट जिल्ह्यांव्यतिरिक्त पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, अमरावती, नागपूर आणि वर्धा यासह इतर आठ जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. या जिल्ह्यांमध्ये (Maharashtra Weather Forecast Update) मुसळधार ते अति मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता आहे. ऑरेंज अलर्ट हा आगामी हवामान परिस्थितीसाठी तयार राहण्याचा इशारा आहे. या जिल्ह्यांतील रहिवाशांना त्यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आलाय.

आयएमडीच्या ताज्या अंदाजानुसार मुंबईत २२ जुलैपर्यंत पुढील चार दिवस हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. शहरात हवामानाची तीव्र स्थिती दिसणार नसली तरी, आजूबाजूचे जिल्ह्यांमध्ये तीव्र वादळाचा अंदाज (Heavy Rain) आहे. कुलाबा येथे गेल्या २४ तासांत १०१ मिमी पाऊस पडला आहे. सांताक्रूझमध्ये गेल्या २४ तासांत ५०.२ मिमी पाऊस पडल्याचं समोर आलंय.

पुणे शहर आणि परिसरात आज हलक्या सरींची तर घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या पावसाळ्यात शिवाजीनगर वेधशाळेत आतापर्यंत ३६२.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोकण,घाटमाथा आणि विदर्भात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. अद्यापही शहराला दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.शिवाजीनगर येथे एक जूनपासून १८ जुलैपर्यंत ३६२.२ मिलिमीटर पाऊस पडतो. या दरम्यान शहरात सरासरी २५६.३ मिलिमीटर पावसाची नोंद होते. यंदा सरासरीपेक्षा १०५.९ मिलिमीटर पाऊस जास्त पडल्याचे चित्र आकडेवारीवरून दिसते. त्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यात धुवाधार पडलेल्या पूर्वमोसमी पावसाचा समावेश आहे.

वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पावसाची शक्यता

सहा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट

कोकण किनारपट्टी भागात देखील मागील ३ ते ६ दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये देखील चांगला पाऊस झालाय. आता भारतीय हवामान खात्याने राज्यातील सहा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी (Latest Rain Update) केलाय. पावसामुळे अनेक ठिकाणी नदीनाल्यांना पूर आल्याचं समोर आलंय. पुढील चार दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. कारण हवामान विभागाने पावसासोबत वादळाचा देखील इशारा दिलाय.

यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी रिमझिम पाऊस तर काही ठिकाणी ढगाळ वातावरणात (Maharashtra Weather Update) आहे. जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहेत.रात्रीपासून जिल्ह्यात रिमझिम पाऊस सुरू होता. यवतमाळ जिल्ह्याला पाच दिवसाचा येलो अॅलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *