महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० जुलै ।। मायक्रोसॉफ्ट बिघाडाचा परीणाम आकाराचे विवरणपत्र दाखल करण्या वर होत आहेत….. ज्या करदात्यां ना टॅक्स ऑडिट लागु नाही अशा करदात्यांची आयकर विवरणपत्र दाखल करण्याची मुदत फक्त 10 दिवस शिल्लक राहिली आहे….त्यामुळे चार्टर्ड अकाऊंटंट, कर सल्लागार व करदाते आयकर विवरणपत्र वेळे वर दाखल करण्या साठी धडपड करीत आहेत परंतु मायक्रोसॉफ्ट च्या बिघडामुळे टॅक्सचे चलन क्लिअर होत नाही बँक अकाऊंट पेमेंट डेबिट होते परंतु इन्कम टॅक्स च्या पोर्टल वर रिफ्लेट होत नाही ज्यामुळे परिणामी आयकर पत्रक दाखल करता येत नाहीत.चलन क्लिअर झाले तरी इन्कम टॅक्स ची साईड खूप बिझी असते कारण शेवटी शेवटी वेळेअभावी सर्वच करदाते व टॅक्स प्रॅक्टिशक्नर रिटर्न वेळेवर दाखल करण्यासाठी घाई करत आहेत त्यामुळे साईट वर ताण पडतो ज्यामुळे साईट स्लो होत आहेत….आयकराचे विवरणपत्र 31 जुलै 2024 च्या आत दाखल झाले नाहीत तर….उशिरा पत्रक दाखल करताना दंड भरावा लागणार आहे….. सदर भुर्दंड करदात्यांना पडू नये म्हणून मायबाप सरकार आयकर रिटर्न भरायची मुदत वाढवून देईल हीच अपेक्षा….