महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० जुलै ।। 18 जुलै रोजी NEET प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान मिळालेल्या सूचनांचे पालन करून NTA ने आज, 20 जुलै रोजी NEET उमेदवारांचे निकाल पुन्हा जाहीर केले आहेत. परीक्षार्थी अधिकृत वेबसाइट exams.nta.ac.in/NEET/ वर जाऊन त्यांचे सुधारित स्कोअर कार्ड डाउनलोड करू शकतात.
40 हून अधिक याचिकांवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने NTA ला NEET चे निकाल शहर आणि केंद्रानुसार पुन्हा जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला आज 20 जुलै दुपारपर्यंतची मुदत दिली होती.
The National Testing Agency (NTA) has declared the state-wise and centre-wise data of the results of the National Eligibility cum Entrance Test (NEET) 2024.
— ANI (@ANI) July 20, 2024
असे चेक करा मार्क
निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला https://exams.nta.ac.in/NEET/ या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
सुधारित स्कोअर कार्ड पाहण्याची लिंक वेबसाइटच्या मुख्य पृष्ठावर आहे, या लिंकवर क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर “NEET 2024 सुधारित स्कोअर कार्डसाठी ‘Click Here’ लिंकवर क्लिक करा करा.
आता अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि ईमेल आयडी किंवा मोबाइल क्रमांक आणि सेक्युरीटी पिन यांसारखी लॉगिन क्रेडेंशियल प्रविष्ट केल्यानंतर तुमचा निकाल दिसेल.
18 जुलै रोजी झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने एनटीएला विद्यार्थ्यांच्या ओळखीची गोपनीयता राखून निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले होते.
परीक्षा रद्द करणे, फेरपरीक्षा घेणे आणि गैरव्यवहाराच्या आरोपांबाबत न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करणे या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने 22 जुलै रोजी अंतिम निकाल देण्याची अपेक्षा आहे.
NTA ने 5 मे रोजी NEET UG 2024 ची परीक्षा घेतली आणि 4 जून 2024 रोजी निकाल जाहीर झाला. NTA द्वारे प्रदान केलेल्या डेटावर आधारित, 9,96,393 पुरुष उमेदवार, 13,31,321 महिला उमेदवार आणि 17 ट्रान्सजेंडर उमेदवार परीक्षेला बसले होते. मात्र यानंतर अशा काही घटना समोर आल्या त्यानंतर परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे.