Income Tax Return : आता घरबसल्या Whatsapp वरून इन्कम टॅक्स रिटर्न भरता येणार; जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ जुलै ।। इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२४ आहे. त्यामुळे करदात्यांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करावेत. अनेकदा आयटीआर भरताना खूप समस्यांना सामोरे जावे लागते. परंतु आता आयटीआर भरणे सोपे झाले आहे. तुम्ही व्हॉट्सअॅपच्या मदतीने आयटीआर अर्ज सहज दाखल करु शकतात. ClearTax ने आयकर रिटर्न फाइल करण्यासाठी एक विशेष सेवा सुरु केली आहे.

आता व्हॉट्सअॅपच्या मदतीने आयटीआर फाइल केल्याने अनेकांना फायदा होणार आहे. याआधी ब्लू कॉलर कर्मचाऱ्यांना आयटीआर फाइल करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागायचे. परंतु आता आर्टिफिशियल इंटेलीजेंस म्हणजेच एआयच्या मदतीने तुम्ही क्लिअरटॅक्सच्या या नव्या सर्व्हिसमुळे कर्मचाऱ्यांना आयटीआर भरणे सोपे होमार आहे. तुम्ही व्हॉट्सअॅपच्या मदतीने चॅट बेस्ड अनुभव घेऊ शकता. एआयच्या मदतीने तुम्ही आयटीआर १ आणि आयटीआर ४ फॉर्म भरु शकतात.

ही सर्व्हिस तुम्हाला १० भाषांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे त्यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे तुम्ही सहज फॉर्म भरु शकतात. जर तुम्हाला फॉर्म भरण्यास काही अडचण आली तर तुम्ही एआयची मदत घेऊ शकतात.

प्रक्रिया

सर्वप्रथम तुम्हाला ClearTax चा व्हॉट्सअॅप नंबर सेव्ह करावा लागेल. त्याच नंबरवर Hi असा मेसेज पाठवावा लागेल.

यानंतर तुम्हाला १० भाषांचे ऑप्शन दिले जातील. त्यातील कोणत्याही एका भाषेची निवड तुम्ही करु शकता.

यानंतर पॅन कार्ड नंबर, आधार कार्ड आणि बँक अकाउंट नंबर सबमिट करा. यानंतर आवश्यक कागदपत्रांना तुम्ही ऑडिओ किंवा टेक्स्ट मेसेजच्या रुपात पाठवू शकतात.

यानंतर आयटीआर १ आणि आयटीआर ४ फॉर्म भरावा लागेल. यामध्ये एआय तुमची मदत करेन.

फॉर्म भरल्यानंतर तो पुन्हा एकदा चेक करा. तुमच्या फॉर्ममध्ये काही चुका नाहीत ना हे एकदा चेक करा. त्यानंतर फॉर्म सबमिट करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *