Budget 2024: सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराच्या ५० टक्के मिळणार पेन्शन ?; अर्थसंकल्पात मोठी घोषणा होण्याची शक्यता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ जुलै ।। देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन २३ जुलै म्हणजेच उद्या संसदेत अर्थसंकल्प जाहीर करणार आहेत. या अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिक, सरकारी कर्मचारी, शेतकऱ्यांसाठी काय नवीन घोषणा करण्यात येतात याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट देण्याच्या तयारीत आहे, असं सांगण्यात येत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेत सुधारणा केली जाऊ शकते.

एका रिपोर्टनुसार, सरकार एनपीएसमध्ये मोठी सुधारणा करु शकते. सरकार नवीन निश्चित पेन्शनची घोषणा या अर्थसंकल्पात करु शकते. अहवालानुसार,NPS ये सदस्या असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या पगाराच्या ५० टक्के पेन्शन देऊ शकते. जर पगाराच्या ५० टक्के पेन्शन सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाली तर त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आतापर्यंत २००४ नंतर नियुक्त झालेले सरकारी कर्मचारी एनपीएसचे सदस्य आहेत. त्यामुळे जर कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याने २५ ते ३० वर्ष एनपीएसमध्ये पैसे भरले असतील तर त्यांना चांगलाच परतावा मिळू शकतो. सध्या NPS मध्ये सरकारी कर्मचारी त्यांच्या मूळ वेतनाच्या १० टक्के रक्कम जमा करतात तर सरकारी त्यांच्या मूळ वेतनाच्या १४ टक्के रक्कम जमा करते.

NPS योजना नक्की आहे तरी काय?
NPS ही सरकारी योजना आहे. या योजनेअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना नियमित योगदान द्यावे लागते. यामध्ये मॅच्युरिटीनंतर कर्मचारी संपूर्ण निधीपैकी ६० टक्के रक्कम काढू शकते. तर त्यांना ४० टक्के पेन्शन फंड खरेदी करावा लागेल. त्यामुळे कर्मचाऱ्यांना नियमित पेन्शन मिळेल.

कर्मचाऱ्यांकडून जुन्या पेन्शन योजनेची मागणी
सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजनेची मागणी करत आहेत. जुन्या पेन्शन योजनेत सरकारी कर्मचाऱ्यांनी निश्चित पेन्शन मिळते. तसेच सरकारकडून महागाई भत्त आणि डीआरदेखील मिळू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *