महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ जुलै ।। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या अर्थसंकल्पाची प्रतीक्षा सर्वांनाच लागली होती. अखेर २३ जुलै रोजी आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीचा देशाचा अर्थसंकल्प निर्मला सीतारामण या सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पामध्ये देशातील सर्वसामान्य नागरीकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या अर्थसंकल्पाकडून मध्यमवर्गाला मोठ्या अपेक्षा असून गरीब आणि शेतकऱ्यांसाठी मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंगळवारी मोठ्या घोषणा होणार आहेत. आर्थिक वर्ष २०२४-२५ चा केंद्रीय अर्थसंकल्प २३ जुलै रोजी लोकसभेत सादर केला जाईल.अर्थमंत्री निर्मला सीतारामण सकाळी ११ वाजता त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात करतील.